शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
4
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
5
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
6
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
7
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
8
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
9
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
10
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
11
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
12
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
13
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
14
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
15
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
16
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
17
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
18
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
19
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
20
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
Daily Top 2Weekly Top 5

कशी कराल शरीराची पवनचक्की?-हा  व्यायाम करून तर पाहा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2020 05:00 IST

खरोखरच्या विंडमिल्सपासून ऊर्जा मिळवतात, हा व्यायाम तुम्हालाही ऊर्जा मिळवून देईल.

ठळक मुद्देहा व्यायाम तुम्ही शाळेत पीटीच्या तासाला केला असेल, पण आता पुन्हा करून पाहा. फार मजा येईल. 

या उन्हाळ्यानी काय घामटं काढलं असेल ना तुमचं?. त्यात घराबाहेर निघायचं नाही, शाळेत जायचं नाही, खेळायला जायचं नाही, ग्राऊंडवर जायचं नाही, मोकळा वारा खायचा नाही. सगळा नन्नाचाच पाढा!तुम्हाला किती बोअर होत असेल, हे मला माहीत आहे, पण याच काळात तर आपली क्रिएटिव्हिटी पणाला लावायची असते. वेगवेगळे प्रयोग करून पाहायचे असतात. जे जे आपल्याला नवीन आहे, माहीत नाही, किंवा ज्याची फक्त तोंडओळख आहे, अशा गोष्टी करून पाहायच्या असतात.आपला व्यायाम जर आणखी इंटरेस्टिंग करायचा असेल, तर त्यासाठीही अशाच नवनवीन गोष्टी जर आपण करुन पाहिल्या, तर आपल्याला नव्या गोष्टी माहीत तर होतातच, पण आपल्या शरीरालाही त्या व्यायामाची सवय होते. कारण प्रत्येक व्यायाम वेगळा असतो आणि त्यातून किमान काही प्रमाणात का होईना, आपल्या शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांना वेगवेगळा व्यायाम मिळतो. आज आपण असाच एक हटके व्यायाम करणार आहोत. या व्यायामाचं नावही तसंच हटके आहे- ‘विंडमिल’! मराठीत याला म्हणायचं पवनचक्की.खास उन्हाळ्यासाठी मी हा व्यायाम तुमच्यासाठी घेऊन आले आहे. खरोखरच्या विंडमिल्सपासून ऊर्जा मिळवतात, हा व्यायाम तुम्हालाही ऊर्जा मिळवून देईल.कशी कराल शरीराची पवनचक्की?

1- अगोदर ताठ उभे राहा.2- आपल्या दोन पायात आपल्या खांद्यांइतकं किंवा त्यापेक्षा थोडं अधिक अंतर घ्या.4- आता कंबरेतून खाली वाका आणि आपल्या शरीराला कंबरेतून थोडा झोका देत आपल्या उजव्या हाताची बोटं डाव्या पायाच्या लावा.5- आता तसंच उलटं, म्हणजे डाव्या हाताची बोटं उजव्या पायाच्या बोटांना लावा.6- पण हे करीत असताना उंभ राहू नका आणि आपले पाय गुडघ्यातून वाकूही देऊ नका. दोन्ही बाजूंनी किमान दहा दहा वेळेस आपलं शरीर या प्रकारे फिरवा.आपल्या शरीराचा हा जो पंखा होईल ना, तीच पवनचक्की!यामुळे काय होईल?1- तुमच्या कंबरेचा छान व्यायाम होईल.2- पोटालाही व्यायाम मिळेल.3- तुमची लवचिकता वाढेल.4- तुमच्यातला उत्साह वाढेल.हा व्यायाम तुम्ही शाळेत पीटीच्या तासाला केला असेल, पण आता पुन्हा करून पाहा. फार मजा येईल. चला, आता हवा येऊ द्या.- तुमचीच ‘पवनचक्की’, ऊर्जा