शहरं
Join us  
Trending Stories
1
भवानीपूर: ममता बॅनर्जी अन् सुवेंदू अधिकारी एकाचवेळी मतमोजणी केंद्रावर; मोठ्या प्रमाणावर पोलीस फोर्स तैनात
2
विजयचा झंझावात एवढा की...! मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन देखील आपली सीट वाचवू शकले नाहीत; TVK चे व्ही. एस. बाबू 'जायंट किलर'
3
पश्चिम बंगाल, तामिळनाडूने बदललं देशाचे राजकारण; इंडिया आघाडीच्या भवितव्यावरही प्रश्न
4
Election Results 2026 LIVE: मुंबईत भाजपाचा 'झालमुरी स्टॉल', पश्चिम बंगाल विजयाचं हटके सेलिब्रेशन
5
NTR, MGR ते जयललिता..; 'या' सुपरस्टार्सनी मुख्यमंत्रिपदापर्यंत मारलेली मजल, पाहा यादी...
6
जबलपूर क्रूझ दुर्घटनेत ५ वर्षांच्या विराजचा मृत्यू; पित्याचा आक्रोश पाहून उपस्थितांच्या काळजाचंही झालं पाणी!
7
“पश्चिम बंगालमध्ये विकासाची बुलेट ट्रेन वेगाने धावेल”; DCM शिंदेंकडून मोदी-शाह यांचे अभिनंदन
8
भीषण अपघात: सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर एसटी बस आणि डंपरची जोरदार धडक; दोन प्रवाशांचा मृत्यू, डंपरने घेतला पेट
9
हिमंता बिस्वांना आव्हान दिले, पण होमग्राऊंडवरच हरले, राहुल गांधींचे सहकारी गौरव गोगोईंचा दारुण पराभव
10
भारताच्या माजी क्रिकेटपटूची राजकीय मैदानात दमदार एंट्री, बड्या नेत्याविरोधात घेतली मोठी आघाडी
11
'या' स्टॉकनं केलं मालामाल! ५ वर्षांत १४००% चं छप्परफाड रिटर्न, आज पुन्हा अपर सर्किट
12
वैशाख अंगारक संकष्ट चतुर्थी २०२६: राहु काळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, चंद्रोदयाची वेळ!
13
मोठी घडामोड! काँग्रेस केरळनंतर दुसऱ्या राज्यातही सत्तास्थापन करणार? थलापती विजयच्या वडिलांचे निमंत्रण
14
UPSC टॉपर घडवणाऱ्या शिक्षिकेचे विद्यार्थ्याकडून अपहण; १.९० कोटी लुटून हॉस्पिटलमध्ये लपला, कारण समोर
15
'सैराट'फेम अरबाज शेखने केला निकाह, कोण आहे 'सल्या'ची पत्नी? रिंकू राजगुरुनेही केली कमेंट
16
"'ट्विंकल-ट्विंकल' शिकण्यासाठी २.५ लाख द्यायचे?"; सिनियर केजीची फी पाहून पालक शॉक
17
दोन सिलिंडर, एकदाच रांगेत राहून भरा, दुप्पट फिरा...! या कंपनीने सीएनजीमध्ये सात सीटर कार लाँच केली
18
बंगालमध्ये सायनी घोष यांचं गाणंच ठरलं गेमचेंजर; भाजपला थेट सत्तेच्या खुर्चीपर्यंत पोहोचवलं
19
'खुल्लम खुल्ला प्यार' आता बंद! 'गर्लफ्रेंड कल्चर' BCCIला अमान्य, 'हे' ४ भारतीय काय करणार?
20
नक्कल करायलाही अक्कल लागते! रोहितच्या स्टाईलमध्ये बाबरचं सेलिब्रेशन; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
Daily Top 2Weekly Top 5

इच वन, टीच टेन...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2020 07:00 IST

onlineशाळा म्हणजे असतं तरी काय?

ठळक मुद्देशाळेत न जाता घरी बसून ऑनलाईन शिकता येतं का?

- रणजितसिंह डिसले, प्राथमिक शिक्षक, परितेवाडी शाळा

तुम्हांला नाम्या जोशी नावाची मुलगी माहितीय का? कधी तीच नाव ऐकलय का? नाही म्हणता, बरं. मी सांगतो. नाम्या ही 14 वर्षांची मुलगी पंजाबमधील जालंधर येथील सतपाल मित्तल शाळेची विद्यार्थिनी. तुमच्याच वयाची आहे. जानेवारी महिन्यात मायक्रोसॉफ्टचे  सत्या नाडेला भारत दौ?्यावर आले होते, त्यावेळी त्यांनी नाम्याला व्यासपीठावर बोलावून सर्वांसमोर तीच कौतुक केल. असं काय केल तिने, ज्यामुळे तीच एवढ कौतुक करण्यात आलंय? ती सध्या एका ध्येयाने झपाटलेली आहे, तीच एक  ध्येय वाक्य आहे, इच वन टीच  टेन! एकाने किमान 10 जणांना शिकवायचे. ती रोज किमान 10 जणांना  ऑनलाईन क्लासच्या माध्यमातून शिकवते. कोण कोण असतं तिच्या ऑनलाईन क्लास मध्ये, तर तुमच्याच वयाची मुले आणि जगभरातील अनेक देशांतील शिक्षक. हो शिक्षक सुद्धा . ती त्यांना गेम तयार करायला शिकवते, तंत्रज्ञांच्या नवनवीन क्ल्युप्त्या शिकवते. तुम्ही रोज टीव्हीवर रामायण बघत असालच, तर याच रामायणावर आधारित गेम तिने तयार केला आहे, जो प्रचंड लोकप्रिय झाला. तुम्हांला प्रश्न पडला असेल कि आमच्या शाळेत तर असलं काही शिकवलं जात नाही, मग नाम्या कुठून शिकली आहे?  नाम्या गेली कित्येक वर्षे ऑनलाईन शाळेत जाते, आणि या नवनव्या बाबी शिकून घेते. म्हणतात न कि ज्ञान दिल्यानं वाढतं; नाम्या नेमकं हेच करतेय. अनेकांना शिकवत असताना ती स्वत:देखील शिकत आहे. मग नाम्याच्या ऑनलाईन  शाळेत जायला  आवडेल का तुम्हाला?