शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
2
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
3
GT vs SRH : गुजरात टायटन्सचा विक्रमी विजय! सनरायझर्स हैदराबादला शंभरीच्या आत गुंडाळत अव्वलस्थानी झेप
4
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
5
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
6
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
7
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
8
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
9
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
10
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
11
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
12
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
13
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
14
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
15
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
16
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
17
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
18
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
19
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
20
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!

By हर्षदा भिरवंडेकर | Updated: November 3, 2025 19:02 IST

Thailand Budget Trip : शिमला-मनाली किंवा काश्मीर ट्रीपसाठी जितके बजेट लागते, तितक्याच बजेटमध्ये हा देश फिरता येतो. जर तुम्ही पहिल्यांदाच परदेशी जाण्याची योजना आखत असाल, तर हा देश उत्तम पर्याय आहे.

परदेशवारी करणं अनेकांसाठी एक स्वप्न असतं. अनेकदा आपल्याला वाटतं की, परदेशात फिरायला जायचं असेल तर किमान १.५ ते २ लाख रुपये आपल्या खिशात असायला हवेत. पण, खरंच परदेशात फिरण्यासाठी एवढा खर्च येतो का? तर नाही. भारतापासून अवघ्या चार ते साडेचार तास दूर असलेल्या एका देशांत तुम्ही अवघ्या ५० हजारांत देखील फिरून येऊ शकता. हा देश आहे 'थायलंड'. शिमला-मनाली किंवा काश्मीर ट्रीपसाठी जितके बजेट लागते, तितक्याच बजेटमध्ये हा देश फिरता येतो. जर तुम्ही पहिल्यांदाच परदेशी जाण्याची योजना आखत असाल, तर थायलंड हा उत्तम पर्याय आहे. 

थायलंडमध्ये काय आहे खास?

थायलंड म्हटलं की अनेकांच्या डोळ्यांसमोर येणारी पहिली गोष्ट म्हणजे तिथली नाईट लाईफ. अर्थात जगभरातील अनेक लोक नाईट लाईफ अनुभवण्यासाठी थायलंडल येतात हे खरं आहे. पण, या सोबतच इथे सुंदर समुद्र किनारे, फी फी, कोरल, फुकेत आयलंड तिथली पांढरी वाळू अन् पाण्याखालचे विश्व उघड्या डोळ्यांनी पाहता येईल इतका स्वच्छ निळाशार समुद्र देखील अनुभवलाच पाहिजे. धमाल-मस्ती आणि मनोरंजनासोबतच इथली मंदिरं ही पर्यटकांचे लक्ष वेधून घेतात. जगातील सगळ्यात उंच गणपती मूर्ती असणारे मंदिर, सोन्याची भगवान बुद्धांची मूर्ती ते पांढऱ्या, जांभळ्या अन् सोनेरी रंगातील मंदिरे बघायलाच  हवीत.

थायलंड आणखी कशासाठी प्रसिद्ध असेल तर, ते तिथल्या वेगवेगळ्या जंगल सफारी आणि अ‍ॅनिमल पार्कसाठी. इथल्या सफारी वर्ल्डमध्ये तुम्ही ओरांग-उटान माकडच्या भन्नाट शोपासून, डॉल्फिन्सची कर्तबगारी आणि हत्ती चित्र काढतानाही बघू शकता. प्राण्यांना खाऊ घालून त्यांच्यासोबत फोटोही काढू शकता. याच देशाच्या बँकॉक शहरात टायगर पार्क आहे. इथे तुम्हाला चक्क वाघाला हात लावण्याची संधी मिळते. शिवाय अजस्त्र वाघासोबात फोटोही काढता येतात. 

शॉपिंग प्रेमींसाठी तर हा देश फिरणं म्हणजे पर्वणीच! इथले वेगवेगळे मार्केट्स जगभरात प्रसिद्ध आहेत. फ्लोटिंग मार्केट, चाटूचाक मार्केट, इंद्रा शॉपिंग सेंटरपासून ते एमबीके मॉल, टर्मिनल २१ आणि फॅशन आयलंड असे मोठमोठे पण खिशाला परवडणारे शॉपिंग हब्स आहेत. 

किती खर्च येतो?

जर तुम्ही ५ दिवसांची थायलंड ट्रीप प्लॅन करत असाल, तर ५०००० रुपये पुरेसे आहेत. हा देश भारतीयांसाठी व्हिसा फ्री आहे. मात्र, या देशात जाताना नियमांनुसार सोबत १० हजार थाई बाथ म्हणजेच साधारण ३० हजार भारतीय रुपये घेऊन जावे लागतात. याच १० हजार बाथमध्ये तुमची उरलेली ट्रीप पूर्ण होऊ शकते.  

विमानाच्या तिकीटांसाठी साधारण १८ हजार रुपये खर्च येतो. स्वस्त तिकीटांसाठी थायलंडचे 'डॉन म्युयोंग' विमानतळ निवडावे. तिथे गेलात की, थायलंडची मेट्रो अवघ्या ५० रुपयांमध्ये सगळी शहरं फिरवते. शिवाय २०० ते ४०० रुपयांत इथे टॅक्सी बुक करता येते. यासाठी ग्रॅब किंवा बोल्ट हे अ‍ॅप वापरता येतात. संपूर्ण थायलंडमध्ये भरपूर भारतीय हॉटेल्स असल्याने जेवणाचीही फार चिंता करावी लागत नाही. २०० बाथ अर्थात ६०० भारतीय रुपयांत अनलिमिटेड जेवण मिळते. दिवसाकाठी ४००० रुपये खर्च करून या देशात आरामात राहू, फिरू आणि खाऊ शकता. सगळीकडे फुकट वायफाय असल्याने इंटरनेट देखील भरपूर वापरता येते.

English
हिंदी सारांश
Web Title : Thailand: Travel abroad for less than a trip to Shimla-Manali!

Web Summary : Thailand offers an affordable foreign trip, costing around ₹50,000. It boasts beaches, temples, night life, animal parks and shopping. A five-day trip needs ₹30,000. Free visa for Indians.
टॅग्स :Thailandथायलंडtourismपर्यटनTravel Tipsट्रॅव्हल टिप्स