जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे 14 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 44 जवान शहीद झाले. जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हा भ्याड हल्ला करण्यात आला. देशात जवानांवर झालेला हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा हल्ला आहे. सीआरपीएफच्या ताफ्यात एकूण 78 वाहने होती आणि त्यातून एकूण 2,547 जवान प्रवास करत होते. जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद दार उर्फ वक्कास याने लाटूमोड येथे ताफ्यावर 350 किलो आरडीएक्स स्फोटकांनी भरलेली कार धडकवून हा आत्मघातकी हल्ला घडवला. Read More
दहशतवादाविरोधात भारताने आपली लढाई सुरू ठेवावी, तिला संपूर्ण सहकार्य व आवश्यक ती मदत करायला आम्ही तयार आहोत, असे रशियाचे प्रमुख व्लादिमीर पुतिन यांनी म्हटले आहे. ...
जैश-ए-मोहम्मद ही संघटना सुरू करणारा क्रूरकर्मा दहशतवादी मसूद अजहर याचा संयुक्त राष्ट्राच्या जागतिक दहशतवाद्यांच्या यादीत समावेश करण्यात चीनची आडकाठी आजही कायम आहे. ...
पुलवामा हल्ला हा भारताच्या अस्मितेवर घाला आहे. अशा कठीण समयी देशातील सर्व विरोधी पक्ष हे लष्कर व केंद्र सरकारच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत, असे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी एका पत्रकार परिषदेत सांगितले. ...
जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे सीआरपीएफच्या जवानांवर दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याविरोधात शुक्रवारी मुंबईत ठिकठिकाणी संताप व्यक्त करण्यात आला. ...
भारतीय लष्करातील २,५०० जवानांच्या ताफ्यावर साडेतीनशे किलो स्फोटके भरलेली कार सोडून, त्यातील ४४ जणांच्या केलेल्या हत्येची जबाबदारी जैश-ए-महम्मद या दहशतवादी संघटनेने घेतली असली, तरी या भीषण हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात आहे हे उघड आहे. ...
लोणावळ्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात निषेध सभा होत असताना पाकिस्तान जिंदाबाद अशी घोषणा देणा-या रेल्वेच्या तिकीट तपासणीसावर (टीसी) लोणावळा शहर पोलीस ठाण्यात कलम १५३ बी नुसार देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला आहे. ...
जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे सीआरपीएफच्या जवानांवर दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याप्रकरणी शुक्रवारी महाराष्ट्रात सर्वसामान्य नागरिकांनी संताप व्यक्त केली. सर्व राजकीय पक्षांनी हल्ल्याचा निषेध करत श्रद्धांजली सभा घेतल्या. ...
काश्मिरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर नांदेड रेल्वेस्थानकातील सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे़ त्याचबरोबर स्थानक व परिसरात डॉग स्कॉडच्या मदतीने वारंवार तपासणी केली जात असून विशेष रेल्वे सुरक्षा बलाची एक तुकडी तैनात करण्यात आली आहे़ ...