देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरोधात टीका करणारे भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांच्याविरोधात मंगळवारी दुपारी काँग्रेस कार्यकर्त्यांनी तीव्र निदर्शने करून, त्यांच्या प्रतिकात्मक फोटोचे दहन केले. ...
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजप-शिवसेनेची युती निश्चित झाली आहे. यामध्ये घनसावंगी मतदार संघ शिवसेनेच्या वाट्याला येणार हे निश्चित मानले जात आहे. त्या दृष्टीने हिकमत उढाण यांनी काम सुरू केले आहे. ...
आपण भाजपमध्ये जाणार नसल्याचे विजयकुमार गोरे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले होते. भाजपच्या स्थानिक नेत्यांमध्ये गोरे भाजपमध्ये येण्यास धडपडत असल्याचे बोलले जात होते. त्यावर गोरे यांनी जोरदार टीका केली होती. ...
शहरासोबतच जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे तिकीट मिळविण्यासाठी इच्छुकांमध्ये चढाओढ सुरू झाली आहे. यापूर्वी विधानसभा लढलेल्यांसह फे्रश चेहऱ्यांनीही यावेळी आपली दावेदारी सादर केली आहे. लोकसभेच्या निवडणुकीत ग्रामीणमधील एकाही विधानसभा मतद ...