देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
काँग्रेस पक्षाच्या वतीने शुक्रवारी (२६ जून) आमदार लहू कानडे यांच्या उपस्थितीत महात्मा गांधी पुतळ्यासमोर चीनने केलेल्या हल्ल्यात शहीद झालेल्या भारतीय जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यानंतर इंधन दरवाढीच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. ...
चीनने केलेल्या हल्ल्यात २० जवान शहीद झाले. जागतिक पातळीवर भारताची मोठी नामुष्की झाली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने चीनबाबतची नेमकी भूमिका तसेच धोरण काय आहे, घडलेल्या प्रकाराबाबतचे नेमके सत्य काय आहे, हे एकदा जनतेला सांगावे, असे आवाहन कोल्हापूर जिल्हा ...
अहिंसेचे उपासक महात्मा गांधी यांच्या पापाची तिकटी चौकातील पुतळ्यासमोर मेणबत्त्या पेटवून तसेच धरणे धरून चीनच्या हल्ल्यात शहीद झालेल्या २० भारतीय जवानांना कोल्हापूर जिल्हा कॉग्रेस समितीच्या वतीने शुक्रवारी श्रद्धांजली वाहण्यात आली. ...
राहुल गांधी यांनी ट्विटरवर, ‘प्रधानमंत्री जी, देश आपसे सच सुनना चाहता है।’ असे कॅप्शन देत एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. याला त्यांनी #SpeakUpForOurJawans असा हॅशटॅगही दिला आहे. ...
Priyanka Gandhi vs. Yogi Adityanath उत्तर प्रदेशच्या बाल संरक्षण आयोगानं पाठवलेल्या नोटिशीला काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी-वाड्रा यांनी सडेतोड उत्तर दिलंय. ...