शहीद जवानांना कॉग्रेस पक्षातर्फे श्रद्धांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2020 05:32 PM2020-06-26T17:32:04+5:302020-06-26T17:34:01+5:30

अहिंसेचे उपासक महात्मा गांधी यांच्या पापाची तिकटी चौकातील पुतळ्यासमोर मेणबत्त्या पेटवून तसेच धरणे धरून चीनच्या हल्ल्यात शहीद झालेल्या २० भारतीय जवानांना कोल्हापूर जिल्हा कॉग्रेस समितीच्या वतीने शुक्रवारी श्रद्धांजली वाहण्यात आली.

Tribute paid to the martyred soldiers by the Congress party | शहीद जवानांना कॉग्रेस पक्षातर्फे श्रद्धांजली

कोल्हापूर जिल्हा कॉग्रेस समितीतर्फे शुक्रवारी पापाची तिकटी येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर मेणबत्त्या पेटवून तसेच धरणे धरून चीनच्या हल्ल्यात शहीद झालेल्या भारतीय जवानांना श्रद्धांजली वाहिली. (छाया : नसीर अत्तार)

googlenewsNext
ठळक मुद्देशहीद जवानांना कॉग्रेस पक्षातर्फे श्रद्धांजलीमहात्मा गांधीजींच्या पुतळ्यासमोर धरणे : मान्यवरांचा सहभाग

कोल्हापूर : अहिंसेचे उपासक महात्मा गांधी यांच्या पापाची तिकटी चौकातील पुतळ्यासमोर मेणबत्त्या पेटवून तसेच धरणे धरून चीनच्या हल्ल्यात शहीद झालेल्या २० भारतीय जवानांना कोल्हापूर जिल्हा कॉग्रेस समितीच्या वतीने शुक्रवारी श्रद्धांजली वाहण्यात आली. भारतीयांच्या स्वाभिमानाला धक्का पोहोचविणाऱ्या चीनबाबत केंद्र सरकारने कठोर भूमिका घ्यावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

अखिल भारतीय कॉग्रेस समिती तसेच महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेसच्या आदेशानुसार कोल्हापूर जिल्हा कॉग्रेस समितीच्या वतीने स्पीकअप इंडियाच्या माध्यमातून हा श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. प्रदेश सचिव तौफिक मल्लाणी यांनी सूत्रसंचलन केले. यावेळी महात्मा गांधी यांच्या अर्धपुतळ्यासमोर मेणबत्त्या पेटवून भारतीय स्वाभिमान जागृत केला; तसेच शहिदांना श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर एक तासभर पुतळ्यासमोर सर्व कार्यकर्त्यांनी धरणे धरले.

या कार्यक्रमात पालकमंत्री सतेज पाटील, कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम, महापौर निलोफर आजरेकर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बजरंग पाटील, उपमहापौर संजय मोहिते, आमदार पी. एन. पाटील, आमदार चंद्रकांत जाधव, आमदार ऋतुराज पाटील, शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, करवीरच्या सभापती अश्विनी धोत्रे, ॲड. गुलाबराव घोरपडे, ॲड. सुरेश कुऱ्हाडे, संध्या घोटणे, सुलोचना नाईकवडे, चंदा बेलेकर, सदाशिव चरापले, दूध संघाचे संचालक बाळासाहेब खाडे, दीपक थोरात, संजय पोवार-वाईकर, सभागृह नेता दिलीप पोवार, कॉग्रेस गटनेते शारंगधर देशमुख, शंकर पाटील, बी. एच. पाटील, भूपाल शेटे, सचिन चव्हाण यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
 

Web Title: Tribute paid to the martyred soldiers by the Congress party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.