शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हाइट हाऊस गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
2
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
3
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
4
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
5
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
6
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
8
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
9
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
10
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
11
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
13
लग्नाच्या जल्लोषात रक्तरंजित वळण; नाचण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाचा खून, चौघांविरोधात गुन्हा दाखल
14
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
15
"छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द खपवून घेणार नाही...", रितेश देशमुखने धीरेंद्र शास्त्रींना स्पष्ट शब्दांत सुनावलं
16
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
17
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
18
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
19
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
20
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

मार्चअखेरीस १४ टक्के पाणीकपात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2020 00:05 IST

साठा चांगला असल्याने तूर्तास संकट टळले

ठाणे : मागील वर्षी आॅक्टोबरपासूनच ठाण्यासह जिल्ह्यातील विविध महापालिका क्षेत्रात पाणी कपात सुरु झाली होती. परंतु यंदा पाऊस चांगला झाल्याने ठाणेकरांवरील पाणीकपातीचे संकट तुर्तास लांबणीवर पडले आहे. ठाणे महापालिकेच्या माध्यमातून किंवा लघु पाटबंधारे विभागाकडून अद्यापतरी पाणी कपात लागू करण्याच्या हालचाली नसल्याचे दिसत आहे. मार्च किंवा एप्रिल महिन्यात पाणी कपात लागू होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.मागील दोन वर्षे ठाण्यासह जिल्ह्यातील विविध महापालिकांच्या ठिकाणी पाणी कपातीचे संकट मोठ्या प्रमाणात ओढावले होते. यंदा मात्र पाणी कपातीचे चटके तुर्तास तरी जिल्ह्यात कुठेही सहन करावे लागत नसल्याचे दिसत आहे. ठाणे शहराला विविध प्राधिकरणांकडून ४८४ दशलक्ष लीटर पाणी पुरवठा केला जातो. मागील वर्षी चांगला पाऊस झाल्याने फेब्रुवारी महिन्यातही धरणांची पातळी बऱ्यापैकी आहे. मागील वर्षी आॅक्टोबर ते डिसेंबरपासूनच ठाण्यात पाणी कपात सुरु झाली होती. मागील उन्हाळ्यात धरणांची पातळीही कमी होती. त्यामुळेच सुरवातीला १४ टक्के आणि त्यानंतर २० टक्क्यांवर पाणी कपात गेली होती. काही भागात आठवड्यातून दोन - दोन दिवस पाणी कपात केली जात होती.यंदा धरणांच्या पातळीचा अंदाज घेतल्यानंतर पाणी कपातीबाबत निर्णय घेतला जाणार आहे. त्यानुसार मार्च अखेरीस किंवा एप्रिल महिन्यात पाणी कपात लागू होण्याची शक्यता असल्याची माहिती पालिका सॅत्रांनी दिली. ही कपात १४ टक्यांच्या जवळपास असण्याची शक्यता आहे.

टॅग्स :water shortageपाणीकपात