शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
2
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
3
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
4
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
5
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
6
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
7
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
8
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
9
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
10
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
11
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
12
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
13
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
14
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
15
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
16
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
17
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
18
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
19
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
20
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीत उड्डाणपुलावर दोन भरधाव कारचा अपघात, दुचाकीस्वाराचा थेट रस्त्यावर पडून दुर्दैवी मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2025 22:06 IST

- नितीन पंडित लोकमत न्यूज नेटवर्क भिवंडी: शहरातील स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे उड्डाणपूलावर बुधवारी सायंकाळी दोन भरधाव कार मध्ये ...

- नितीन पंडितलोकमत न्यूज नेटवर्कभिवंडी: शहरातील स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे उड्डाणपूलावर बुधवारी सायंकाळी दोन भरधाव कार मध्ये झालेल्या ठोकरीत कार जागेवर वळल्याने कारच्या मागील दुचाकीस्वार थेट कारला ठोकर लागल्याने दुचाकी वरून उडून खाली रस्त्यावर पडल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. राहुल दादाराम तरे वय ३२ रा.अंजूर असे मयत दुचाकीस्वाराचे नाव असून कार चालक अब्दुल्ला मोहम्मद इलियास अन्सारी रा.मिल्लत नगर हा गंभीर जखमी झाला आहे.

भिवंडी कडून कल्याणच्या दिशेने होंडा सिटी कार चालक अब्दुल्ला मोहम्मद इलियास अन्सारी हा भरधाव वेगाने चालला असता भादवड येथील अरिहंत सिटी समोर आला असता त्यावेळी समोरून येणाऱ्या महिंद्रा एक्स यू व्ही कार यांच्यात जोरदार धडक झाली .ज्यामुळे दोन्ही कारच्या समोरील बाजूचे अतोनात नुकसान होऊन कार चालक अब्दुल्ला गंभीर जखमी झाला.तर महिंद्रा एक्स यू व्ही कार मधील एअर बॅग उघडल्याने ते बचावला असून त्यास किरकोळ मार लागला आहे.या अपघातात होंडा सिटी कार जागेवरच वळल्याने याच वेळी होंडा सिटी कार मागून वेगाने येणाऱ्या दुचाकीची धडक कारला बसल्याने दुचाकीस्वार राहुल तरे हा थेट उड्डाणपुलावरून ५० फूट खालील रस्त्यावर फेकला गेला.ज्यामध्ये राहुलचा जागेवरच मृत्यू झाला आहे. तर कार चालक जखमी झाला आहे.

 या उड्डाणपुलावर या आधी सुद्धा अपघात झाल्याने उड्डाणपुलावरून थेट रस्त्यावर पडून झालेल्या अपघातात तीन जणांचा बळी गेला आहे. पुलावरील अरुंद रस्ता व दुभाजक नसल्याने या मार्गावर नेहमीच अपघाताच्या घटना घडत आहेत.या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अपघाती घटनेची नोंद घेतली जात आहे.राहुलच्या दुर्दैवी मृत्यू नंतर अंजूर गावात शोककळा पसरली आहे.

टॅग्स :Accidentअपघात