शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
4
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
5
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
6
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
7
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
8
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
9
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
10
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
11
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
12
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
13
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
14
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
15
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
16
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
17
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
18
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
19
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
20
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे शहरातून दहा दिवसांमध्ये दोघे बेपत्ता: गूढ वाढले

By जितेंद्र कालेकर | Updated: April 21, 2021 23:43 IST

ठाणे शहरातील वेगवेगळया भागातून प्रदिप पांडूरंग पालकर (५५) आणि रोशन बनारसी बेनबन्सी (२३) हे दोघे गेल्या दहा दिवसांमध्ये बेपत्ता झाले आहेत. नौपाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी त्यांच्या कुटूंबीयांनी तक्रार दाखल केली आहे.

ठळक मुद्दे नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा पोलिसांची विशेष पथके

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: ठाणे शहरातील वेगवेगळया भागातून प्रदिप पांडूरंग पालकर (५५) आणि रोशन बनारसी बेनबन्सी (२३) हे दोघे गेल्या दहा दिवसांमध्ये बेपत्ता झाले आहेत. नौपाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी त्यांच्या कुटूंबीयांनी तक्रार दाखल केली असून या दोघांचाही शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.खोपट, सिंगनगर भागातील रहिवाशी प्रदिप हे ९ एप्रिल २०२१ रोजी सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास सिंगनगर चाळ क्रमांक पाच येथील आपल्या घरातून निघून गेले. घरातून बाहेर पडतांना त्यांनी कोणालाही काहीही माहिती दिली नाही. दोन दिवस उलटूनही ते घरी न परतल्यामुळे ते बेपत्ता झाल्याची तक्रार पालकर कुटूंबीयांनी नौपाडा पोलीस ठाण्यात ११ एप्रिल रोजी केली. अर्थात २० एप्रिलपर्यंतही त्यांचा शोध लागू शकलेला नाही. त्यांचा शोध घेण्यात येत असल्याचे नौपाडा पोलिसांनी सांगितले.दरम्यान, पालकर यांच्यापाठोपाठ नौपाडा भागातील अन्य एक रहिवाशी रोशन बनारसी बेनबन्सी (२३) हा तरुणही १२ एप्रिल २०२१ पासून दुपारी १२ वाजल्यापासून बेपत्ता झाला आहे. तो नौपाडयातील विवाह नोंदणी कार्यालय येथे त्याच्या पालकांना १२ एप्रिल रोजी दिसला होता. त्यावेळी ते त्याला भेटण्यासाठी गेले. मात्र, तेंव्हापासून तो बेपत्ता झाल्याचे रोशनचे वडिल बनारसी यांनी पोलिसांना सांगितले. रोशन याचाही शोेध घेण्यात येत असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले यांनी सांगितले.*हिरेन प्रकरणामुळे बेपत्ता व्यक्तींबाबत अधिक सतर्कतामनसुख हिरेन बेपत्ता झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांचा मृतदेह मुंब्रा रेतीबंदर खाडीत आढळला होता. त्यानंतर त्यांची हत्या झाल्याचे आढळले. हिरेन प्रकरणामुळे आता कोणीही बेपत्ता झाले तरी पोलीस अधिक सतर्क होऊन बारकाव्याने तपास करीत असल्याचे नौपाडा पोलिसांनी सांगितले.* अशी आहेत कारणे-लॉकडाऊनमुळे घरात आर्थिक अडचण, कुटूंबात होणारे वाद, पती पत्नींमधील कलह, कामधंदा नसणे, कर्जबाजारीपणा किंवा प्रेमप्रकरण अशा अनेक कारणांमुळे घरातून कोणालाही काही न सांगता बेपत्ता होण्याचे प्रमाणही वाढले असल्याची माहिती एका पोलीस अधिकाºयाने दिली. अनेकदा घरगुती कारणातून किंवा तणावातूनही बेपत्ता झालेल्या व्यक्ती कालांतराने मिळतात. परंतू, त्या मिळेपर्यंत कुटूंबातील इतर व्यक्ती तणावाखाली असतात, असेही या अधिकाºयाने सांगितले.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारी