शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
2
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
3
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
4
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
5
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
6
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
7
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
8
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
9
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
10
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
11
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
12
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
13
Mumbra Shocking: ‘ॲक्शन रील’चा भयंकर शेवट, आठ वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू, नेमकं काय घडलं?
14
"कोणाच्या खिशात आहेत माझे पैसे?"; बोनस मिळाल्याच्या चर्चांवर राकेश बेदींचा मजेशीर व्हिडीओ
15
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
16
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
17
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
18
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
19
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
20
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
Daily Top 2Weekly Top 5

प्रियकराच्या मदतीने पतीचा खून करणाऱ्या पत्नीसह तिघांना अटक

By जितेंद्र कालेकर | Updated: March 3, 2021 20:44 IST

पतीकडून वारंवार होत असलेल्या मारहाणीला कंटाळून अनैतिक संबंध ठेवलेल्या प्रियकराच्या मदतीने पतीचा खून करणाºया रुक्सार शेख (३०) या पत्नीसह तिघांना अटक केल्याची माहिती ठाण्याचे पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी बुधवारी दिली.

ठळक मुद्देमुंब्रा पोलिसांनी लावला खूनाचा छडा

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: पतीकडून वारंवार होत असलेल्या मारहाणीला कंटाळून अनैतिक संबंध ठेवलेल्या प्रियकराच्या मदतीने पतीचा खून करणाºया रुक्सार शेख (३०) या पत्नीसह तिघांना अटक केल्याची माहिती ठाण्याचे पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी बुधवारी दिली. सुरुवातीला कोणताही धागादोरा नसतांना मोठया कौशल्याने मुंब्रा पोलिसांनी या खूनाचा छडा लावला.मुंब्रा येथील खाडीवरील जुन्या पुलाजवळील एमएम व्हॅलीकडे जाणाºया रस्त्याच्या वळणावर एका अनोळखीच्या गळयावर चॉपरने वार करुन त्याचा खून केल्याचे २७ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी ८.४० वाजण्याच्या सुमारास आढळले होते. याप्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध खून आणि पुरावा नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. या खूनातील मृतदेहाची ओळख पटवून आरोपींचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी या खूनाच्या तपासासाठी विशेष पथकांच्या निर्मितीचे आदेश दिले होते. दरम्यान, हा मृतदेह अहमद शेख याचा असल्याची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले. सहायक पोलीस आयुक्त नीता पडवी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, निरीक्षक रामचंद्र वळतकर, सहायक पोलीस निरीक्षक संतोष उगलमुगले आणि शहाजी शेळके यांच्या पथकाने अहमद शेखची पत्नी रक्सार आणि मेव्हणी रेश्मा यांच्याकडे केलेल्या चौकशीमध्ये त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. यातूनच त्यांच्यावर या पथकाचा संशय बळावला. त्यानंतर या पथकाने त्यांच्या सर्व हालचालींवर बारकाईने नजर ठेवली. तेंव्हा रुक्सारचा प्रियकर मोहम्मद नफील शेख (३०) याच्याकडे केलेल्या चौकशीमध्ये अहमद याची पत्नी रुक्सार आणि मेव्हणी रेश्मा (२८) यांच्याशी संगनमत करुन अहमद दाऊद शेख याचा खून केल्याची कबूली दिली. त्यानंतर मोहमद शेख, रुक्सार आणि रेश्मा या तिघांना २ मार्च रोजी मुंब्रा पोलिसांनी अटक केली.* असा घडला प्रकार:अहमद हा त्याची पत्नी रुक्सार हिला नेहमी क्षुल्लक कारणावरुन मारहाण करीत होता. याच मारहाणीला कंटाळून तिने प्रियकर मोहमद आणि रश्मी यांच्याशी २४ फेब्रुवारी रोजी पतीला मारण्याचा कट केला. याच कटातून २७ फेब्रुवारी रोजी त्याचा खून करण्यात आला. मात्र, मुंब्रा पोलिसांनी केलेल्या कौशल्यपूर्ण तपासातून हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. सहायक पोलीस आयुक्त नीता पाडवी या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत. 

 

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीArrestअटक