शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे सत्र न्यायालयाने फिर्यादीलाच ठोठावला दंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2025 09:20 IST

न्यायालयाचा वेळ वाया घालवल्याप्रकरणी शुक्रवारी हा दंड ठोठावण्यात आल्याची माहिती सरकारी वकील संजय मोरे यांनी दिली.

ठाणे : काशिमीरा पोलिस ठाण्यात नोंदवलेल्या खंडणी आणि मारहाणीच्या गुन्ह्यात फिर्यादी यांना ठाणे सत्र न्यायालयाने २५ हजारांचा दंड ठोठावला आहे. पोलिस यंत्रणा आणि न्यायालयाचा वेळ वाया घालवल्याप्रकरणी शुक्रवारी हा दंड ठोठावण्यात आल्याची माहिती सरकारी वकील संजय मोरे यांनी दिली.

फिर्यादी देवकुमार शेट्टी हे मीरा रोड, महाजनवाडी येथील ए बॉसी बारचे मॅनेजर आहेत. १३ मार्च रोजी आरोपी उजाला चौधरी यांनी ते दीपक पांडे याचा माणूस असून बार सुरू ठेवायचा असेल, तर दरमहा २५ हजार हप्ता द्यावा लागेल, असे शेट्टी यांना सांगितले. त्याला शेट्टी यांनी नकार दिल्यावर चौधरी यांनी मारहाण करून चाकूचा धाक दाखवला. तसेच खंडणी न दिल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी काशिमीरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर चौधरी याने ठाणे सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज केला होता. त्या अर्जाची सुनावणी न्यायाधीश अमित शेटे यांच्यासमोर आल्यावर शेट्टी यांनी चौधरी यांना जामीन देण्यास काही हरकत नाही, असे प्रतिज्ञापत्र सादर केले. त्याला सरकारी वकील संजय मोरे यांनी तीव्र आक्षेप नोंदवला. तो आक्षेप  न्यायालयाने ग्राह्य धरला.

एक आठवड्यात रक्कम जमा करान्यायालयाने चौधरी याला जामीन मंजूर करताना, पोलिस यंत्रणा आणि न्यायालयाचा वेळ वाया घालवला म्हणून शेट्टी यांना २५ हजार रुपये दंड ठोठावला. दंडाची रक्कम एक आठवड्यात सरकारी दप्तरी जमा करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत, अशी माहिती सरकारी वकील मोरे यांनी दिली.

टॅग्स :thaneठाणेCourtन्यायालय