शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

काळ्याबाजाराकडे ठाणे पालिकेचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 00:47 IST

रेमडेसिविरबाबत महापौरांचा संताप : प्रशासनाच्या ढिम्म कारभाराचे वाभाडे

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : ठाण्यात रेमडेसिविरचा तुटवडा जाणवत असताना महापालिकेच्या कोविड सेंटरमधून काही दिवसांपूर्वी त्याचा काळाबाजार करणाऱ्यास अटक केली आहे. याचा तपास ठाणे पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने सुरू केला, मात्र पालिकेच्या आरोग्य विभागाने याची साधी चौकशीही केली नसल्याची धक्कादायक माहिती मंगळवारी झालेल्या महासभेत उघड झाली. यासंदर्भात महापौर नरेश म्हस्के यांनी आरोग्य अधिकाऱ्यांना चांगलेच सुनावून याचा तपास आरोग्य विभागाने केलाच पाहिजे असे स्पष्ट केले.

महापालिका हद्दीत सध्या रेमडेसिविरचा तुटवडा  आहे. ते इंजेक्शन मिळावे यासाठी महापालिका जास्तीची किमंत मोजण्यासही तयार झाली. पण, महापालिकेच्या कोविड सेंटरमधून त्याचा काळा बाजार केला जात असल्याची माहिती काही दिवसांपूर्वी उघड झाली. ठाणे खंडणी विरोधी पथकाने ही कारवाई  केली. एक आराेपी ग्लोबल कोविड सेंटरमध्ये कामाला होता. त्यामुळे या प्रकरणाचा तपास आरोग्य विभागाकडून होणे अपेक्षित होते, अशी माहिती म्हस्के यांनी महासभेत दिली.आराेपीला रेमडेसिविर कोण देत होते, कोणाकडून त्याने ते उचलले होते, याची माहिती आरोग्य विभागाने घेणे गरजेचे होते. परंतु, त्यांनी या प्रकरणाकडे काहीच लक्षच दिले नसल्याचेही महासभेत उघड झाले आहे.

या प्रकरणाची चौकशी आरोग्य विभागाने केली का? असा सवालही महापाैरांनी केला. त्यावर खंडणी विरोधी पथक या प्रकरणाची चौकशी करीत असल्याने आम्ही त्याची चौकशी केली नसल्याचे  प्रभारी आरोग्य अधिकारी वैजयंती देवगीकर यांनी सांगितले. त्यामुळे महापाैर आणखीन संतप्त झाले.महापालिकेच्या कोविड सेंटरमधून जर इंजेक्शन गायब होत असतील त्याची जबाबदारी ही आरोग्य विभागाची नाही का?, त्याचा तपास हा झालाच पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले. एकूणच या प्रकरणात आरोग्य विभागाची चूक असून ती सुधारणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले. काही दिवसांपासून ठाण्यात रेमडेसिविरचा तुटवडा जाणवत होता. पण, आता ठाणे महापालिकेकडे उपलब्ध असलेला सगळाच साठा संपला असल्याची धक्कादायक माहिती उघड आली होती. दुसरीकडे ठाण्यातील खाजगी रुग्णालयांना अद्याप रेमडेसिविरचा साठा मिळालेला नाही. त्यामुळे दाखल रुग्णांवर उपचार कसे करायचे, असा पेच आहे.

दुसरीकडे, ठाणे महापालिकेकडे सोमवारी केवळ २०० रेमडेसिविर शिल्लक राहिले होते. मंगळवारी ग्लोबल रुग्णालयात एकही रेमडेसिविर नसल्याची माहिती पालिकेने दिली होती. येथे सध्या ९५० रुग्णांवर उपचार सुरू असून येथे रोज ५०० च्या आसपास आवश्यक असल्याचेही पालिकेच्या सूत्रांनी सांगितले.१८ एप्रिलपर्यंत उपलब्ध साठा मिळेल अशी आशा पालिकेला वाटत होती. पालिकेची ही आशा फोल ठरली हाेती. जिल्हाधिकारी कार्यालयातही रोज साठा येत असला तरी मागणी अधिकची असल्याने ती पूर्ण करताना त्यांचीही दमछाक होत आहे. काही खाजगी रुग्णालये आजही रुग्णांच्या नातेवाइकांना रेमडेसिविरसाठी पत्र देत आहेत. 

ठाणे महापालिकेला मिळाले 200 रेमडेसिविरठाणे :  पालिकेकडील साठा संपल्यानंतर आता एक दिवसापुरतेच सुमारे २०० रेमडेसिविर ग्लोबल रुग्णालयाला मिळाल्याची माहिती पालिकेने दिली. रोज असा साठा उपलब्ध होईल, असेही स्पष्ट केले आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या