कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर एको टॅक्सी आणि सिमेंट काँक्रिट मिक्सर ट्रक यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात ११ जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त असून दोन जण गंभीर जखमी असल्याचे समजते. मृत सर्वजण मुरबाड तालुक्यातील रहिवासी असून, ते कल्याणहून मुरबाडकडे जात होते. पुलावर एकमार्गी वाहतूक सुरू असल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
मृतदेह गोविली ग्रामीण रुग्णालयात आणल्याचेही समजते. या घटनेनंतर स्थानिकांनी संताप व्यक्त करत, घाईघाईत पूल सुरू करण्यात आल्याने आणि योग्य ती खबरदारी न घेतल्याने हा अपघात घडल्याचा गंभीर आरोप प्रशासनावर केले आहेत. तसेच, एको टॅक्सीमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी असल्याची माहितीही समोर येत आहे. यामुळे दुर्घटनेची तीव्रता वाढल्याचे सांगितले जात आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली असून, जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
Web Summary : Eleven people died and two were seriously injured in a collision between a taxi and a cement mixer on the Kalyan-Nagar highway. The deceased were residents of Murbad. Locals allege the bridge was opened hastily, causing the accident. Overcrowding in the taxi worsened the impact.
Web Summary : कल्याण-नगर राजमार्ग पर एक टैक्सी और सीमेंट मिक्सर के बीच टक्कर में ग्यारह लोगों की मौत हो गई और दो गंभीर रूप से घायल हो गए। मृतकों मुरबाड के निवासी थे। स्थानीय लोगों का आरोप है कि पुल को जल्दबाजी में खोला गया, जिससे दुर्घटना हुई। टैक्सी में भीड़भाड़ से प्रभाव और खराब हो गया।