शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

"प्रत्येक बुथ आणि मंडल मजबूत करा", रविंद्र चव्हाणांचा भाजप पदाधिकाऱ्यांना कानमंत्र

By अजित मांडके | Updated: July 22, 2024 18:03 IST

विधानसभा निवडणुकीत भाजपसह महायुतीच्या उमेदवारांना ५१ टक्के मते मिळण्यासाठी झटावे, असे आवाहन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सोमवारी येथे केले.

ठाणे : कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत पक्षाला ७५ टक्के मतदान झाले. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी संघटनात्मक ताकदीने हा विजय साकारला. आता लोकसभेनंतर विधानसभा निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी प्रत्येक मंडल व बूथ मजबूत करावा. प्रत्येक बूथसाठी प्रवासी योजना तयार करावी. प्रत्येक घरातील नागरिकांपर्यंत संपर्क साधावा. नवमतदारांच्या संख्येत वाढ झाली असून, प्रत्येक मतदाराची नोंदणी करण्यावर भर द्यावा. विधानसभा निवडणुकीत भाजपसह महायुतीच्या उमेदवारांना ५१ टक्के मते मिळण्यासाठी झटावे, असे आवाहन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सोमवारी येथे केले.      कोकण पदवीधर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार निरंजन डावखरे यांचा विजय व भाजपच्या प्रदेश महाअधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर भाजप ठाणे शहर, ठाणे ग्रामीण, भिवंडी शहर, मिरा-भाईंदर, नवी मुंबई, उल्हासनगर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या स्वतंत्रपणे बैठका घेण्यात आल्या. या बैठकीत भाजपचे नेते व मंत्री रवींद्र चव्हाण बोलत होते. या वेळी माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, माजी मंत्री व आमदार गणेश नाईक, संजय केळकर, निरंजन डावखरे, महेश चौगुले, माजी खासदार संजीव नाईक, ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, ठाणे ग्रामीण अध्यक्ष मधुकर मोहपे, भिवंडी शहर अध्यक्ष हर्षल पाटील, मिरा-भाईंदरचे अध्यक्ष किशोर शर्मा, नवी मुंबईचे अध्यक्ष संदीप नाईक यांच्यासह विविध जिल्ह्यांचे जिल्हाध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते.

आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपसह महायुतीच्या विजयासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी झटून काम करावे. विधानसभा निवडणुकीसाठी अवघ्या साडेतीन महिन्यांचा कालावधी राहिला असून, पक्षकार्यकर्त्यांनी संघटनात्मक दृष्टीने पक्षाला मजबूत करावे, असे आवाहन चव्हाण यांनीकेले. तर महायुतीची राज्यात पुन्हा सत्ता आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी निर्धार करावा, असे आवाहन माजी राज्यमंत्री कपिल पाटील यांनी केले.

पुणे येथील भाजप प्रदेश महाअधिवेशनात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप कार्यकर्त्यांना संदेश दिला आहे. ती भाषणे प्रत्येक कार्यकत्यार्ने पहावी. देशाचे राजकारण पुढे नेण्यासाठी भाजपला महाराष्ट्रात विजय हा आवश्यक आहे. त्यादृष्टीने मरगळ झटकून कार्यकर्त्यांनी कार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले. माजी केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनीही मार्गदर्शन केले. प्रत्येकाने पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता असे समजून राज्यात पुन्हा महायुतीच्या विजयासाठी कार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

टॅग्स :thaneठाणेBJPभाजपा