शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
3
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
4
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
6
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
7
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
8
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
9
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
10
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
11
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
12
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
13
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
14
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
15
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
16
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
17
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
18
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
19
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
20
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

स्थायी वादात, नगरसेवक तोंडघशी

By admin | Updated: January 10, 2016 00:26 IST

पालिका स्थायी समितीने अत्यावश्यक कामांच्या नावाखाली कोट्यवधींच्या कामांना विनानिविदा मंजुरी दिली आहे. यातील बहुतांश कामे वादात सापडली असून नेताजी गार्डनच्या कामाच्या

- सदानंद नाईक,  उल्हासनगरपालिका स्थायी समितीने अत्यावश्यक कामांच्या नावाखाली कोट्यवधींच्या कामांना विनानिविदा मंजुरी दिली आहे. यातील बहुतांश कामे वादात सापडली असून नेताजी गार्डनच्या कामाच्या चौकशीचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. ठेकेदारांसह संबंधितांवर कारवाईची शक्यता निर्माण झाली असून त्या संबंधित नगरसेवक तोंडघशी पडले आहेत.उल्हासनगर पालिका स्थायी समितीत काही आलबेल नसल्याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. समिती बैठकीतील माहिती पत्रकारांपर्यंत जाऊ नये, याची काळजी सत्ताधाऱ्यांसह विरोधी सदस्य घेत आहेत. सर्व विषय सर्वसंमतीने मंजूर होत असताना महासभेत एकमेकांसमोर उभे ठाकल्याचे नाटक होत आहे. कलम ५(२)(२) कामाच्या नावाखाली निविदा न काढता कामाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली जात आहे. ही कामे निकृष्ट अथवा होतच नसल्याचे उघड झाले आहे.स्थायी समितीने अत्यावश्यक कामांच्या नावाखाली नेताजी गार्डनच्या सुशोभीकरणाच्या कामाला मंजुरी दिली आहे. ३५ लाखांच्या निधीतून दुरुस्ती, नूतनीकरण तर ३ लाखांच्या अतिरिक्त निधीतून लायटिंगचे काम ठेकेदाराला देण्यात आले. दुरुस्तीविनाच निधी लाटल्याचा आरोप झाल्याने पत्रकारांनी आयुक्त मनोहर हिरे यांच्याकडे चौकशीची मागणी केली. कामाच्या चौकशीची मागणी होताच अचानक आठ दिवसांत फाइल गायब होऊन अधिकाऱ्यांची तारांबळ उडाल्याचा प्रकार समोर आला आहे. - आयुक्तांनी चौकशीचा अहवाल दोन दिवसांत सादर करण्याचे आदेश लेखा विभागासह बांधकाम विभागाला दिले आहेत. काम न होताच बिल अदा केलेच कसे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.