शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
2
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
3
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
4
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
5
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
6
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
7
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
8
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
9
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
10
काकडी फक्त सॅलड नाही, तर आहे 'सुपरफूड'; पण जास्त खाणं टाळा, अन्यथा होईल नुकसान
11
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
12
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
13
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
14
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
15
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
16
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
17
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
18
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
19
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
20
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
Daily Top 2Weekly Top 5

लसीकरण केंद्रावर शिवसेना आणि भाजप पदाधिकारी भिडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अंबरनाथ : बदलापूरमध्ये कोरोना लसीकरण केंद्रावर शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

अंबरनाथ : बदलापूरमध्ये कोरोना लसीकरण केंद्रावर शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. बुधवारी दुपारी बदलापूर पालिकेच्या दुबे रुग्णालयात हा प्रकार घडला. हाणामारीची ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. याप्रकरणी परस्परविरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोरोना लसीकरण केंद्रांवर राजकीय कार्यकर्ते वशिलेबाजी करत असल्याच्या तक्रारी बदलापुरात अनेकदा समोर आल्या होत्या. राजकीय पुढारी आणि नगरसेवक हे आपल्या प्रभागातील नागरिकांना लसीकरण केंद्रावर वशिल्याने आतमध्ये प्रवेश देत होते. त्याच वादातून आज शिवसेनेचे पदाधिकारी आणि भाजपचे पदाधिकारी एकमेकांवर धावून गेले. एकीकडे लसीकरण सुरू असताना दुसरीकडे शिवसेना आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये हाणामारी सुरू झाली. ही हाणामारी सोडवण्यासाठी काही नागरिक व सुरक्षारक्षकदेखील पुढे सरसावले, मात्र त्यांना आवरणे सुरक्षारक्षकांनादेखील अवघड गेले. अक्षरशः खाली पाडून लाथाबुक्क्यांनी एकमेकांना मारले. याचवेळी एका गटाच्या कार्यकर्त्याने दुसऱ्या गटाच्या कार्यकर्त्याच्या डोक्यात बेंच टाकला. या प्रकारामुळे लसीकरण केंद्रावर काही काळ गदारोळ निर्माण झाला होता. हा सगळा प्रकार लसीकरण केंद्रावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. दरम्यान, या प्रकाराबाबत बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

----------------