शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

कमी पावसामुळे भात उत्पादनावर परिणाम

By admin | Updated: November 2, 2015 01:37 IST

डहाणू तालुक्यात सध्या भातकापणी तसेच भात झोडणीचा हंगाम सुरु आहे. मात्र पावसाचे कमी प्रमाण व अनियमितता यामुळे भाताच्या उत्पादनावर विपरीत परिणाम झाला आहे

शशिकांत ठाकूर, कासा डहाणू तालुक्यात सध्या भातकापणी तसेच भात झोडणीचा हंगाम सुरु आहे. मात्र पावसाचे कमी प्रमाण व अनियमितता यामुळे भाताच्या उत्पादनावर विपरीत परिणाम झाला आहे. त्यात मोठी घट झाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. गेल्या वर्षीपेक्षा यंदा सरासरी ४०.६३ मीमी पाऊस कमी झाला आहे.तालुक्यात यंदा सरासरी केवळ ६७.१ मि.मि. पावसाची नोंद झाली. तालुक्यात सुमारे १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भातशेती केली जाते. यामध्ये गरवी भातशेती ९,५०० हेक्टर तर हळवी भातशेती ५५०० हेक्टर क्षेत्रावर केली जाते. सूर्या कालव्याच्या पाण्यावर उन्हाळ्यात सुमारे ७५०० हेक्टर क्षेत्रावर भातशेती केली जाते. तालुक्यात यंदा पाऊस वेळेवर सुरू झाला नाही आणि पाऊस सुरु झाल्यानंतरही त्यात नियमीतता नाही. त्यामुळेही भाता लागवडीवर परिणाम झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. भातपेरणी झाल्यानंतर २१ दिवसाच्या कालावधीत रोप तयार होऊन लागवड होणे गरजेचे आहे. मात्र लागवडीसाठी पाऊसच वेळेवर सुरु न झाल्याने शेतकऱ्यांना महिनाभर भात रोपणासाठी वाट पहावी लागली. लागवडीनंतरही पाऊस खूप कमी तसेच वेळेवर न झाल्याने पिकाच्या उत्पादनावर परिणाम झाला. त्यामुळे काही ठिकाणी उष्णतेमुळे पिके होरपळून गेली. तसेच कणीस बाहेर येण्याच्या कालावधीत तसेच रोपाला फुटवा येणाच्या वेळेस बऱ्याच ठिकाणी पाऊसच झाला नाही. तर काही शेतकऱ्यांनी बाजारातून संकरीत जातीच्या वाणाची खरेदी केली असता ते बियाणे बनावट असल्याने दाणे उगवलेच नसल्याचे शेतकऱ्यांनी तक्रारी मोठ्या प्रमाणात केल्या आहेत. तसेच पावसा अभावी व रोगांच्या प्रादुर्भावामुळे भात उत्पादनावर परिणाम झाल्याचे शेतकरी जयेंद्र ठाकूर यांनी सांगितले.