शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

प्रसाद वाटणा-या सार्वजनिक मंडळांची होणार नोंदणी

By admin | Updated: August 27, 2014 00:04 IST

नव्या अन्न सुरक्षा कायद्यानुसार सार्वजनिक उत्सवाच्या ठिकाणी प्रसाद वाटणा-या मंडळांची यंदापासून अन्न व औषध प्रशासन विभाग नोंदणी करणार आहे.

ठाणे : नव्या अन्न सुरक्षा कायद्यानुसार सार्वजनिक उत्सवाच्या ठिकाणी प्रसाद वाटणा-या मंडळांची यंदापासून अन्न व औषध प्रशासन विभाग नोंदणी करणार आहे. तसेच ज्या ठिकाणी प्रसादाचे वाटप केले जाणार आहे, त्यांना काही गाइड लाइन्सही घालून दिल्या आहेत. त्यामुळे मंगलप्रसंगी कोणतेही विघ्न येऊ नये म्हणूनही खबरदारी घेण्याचे आवाहन गणेशोत्सव सार्वजनिक मंडळांना प्रशासनाने केले आहे. सार्वजनिक उत्सवात अन्नविषयक सेवांचा समावेश होत असल्याने अन्न व औषध प्रशासनाने प्रसाद करताना जागा, भांडी स्वच्छ व आरोग्यदायी असावीत, यावर भर देऊन त्यासाठी लागणारा कच्चा माल (अन्नपदार्थ) परवानाधारक व्यावसायिकांकडून खरेदी करावा. फळांचा प्रसाद म्हणून वाटप करताना फळांची खरेदी परवानाधारकांकडून करावी तसेच कच्च्या किंवा खराब फळांचा वापर टाळावा. प्रसादाचे उत्पादन करताना मानवी सेवनास सुरक्षित राहील, याची खात्री करून आवश्यक तेवढ्याच प्रसादाची निर्मिती करावी. त्यासाठी लागणारे पाणी पिण्यास योग्य असावे. ते वाटप करणाऱ्या स्वयंसेवकांस अ‍ॅप्रन, ग्लोव्हज, टोपी इत्यादी देण्याबरोबर प्रत्येक वेळी हात धुवावेत, असे सुचवले आहे. त्याचबरोबर प्रसादासाठी खवा किंवा माव्याचा वापर होत असल्यास अतिदक्षता घ्यावी. दूध अथवा दुग्धजन्य पदार्थ विशेषत: ४ सेल्सिअस अथवा कमी तापमानावरच साठवून ठेवावे. तसेच ते वाहनातूनच आणावे. विशेष म्हणजे शिळा किंवा अनेक दिवस कोल्ड स्टोअरेज केलेला मावा प्रसादासाठी वापरू नये. प्रसाद बनवणाऱ्या मंडळांनी प्रसादाच्या कच्च्या मालासह तो तयार करणाऱ्या आणि त्याचे वितरण करणाऱ्यांची इत्थंभूत माहिती घ्यावी. तसेच तपासणीसाठी आलेल्या अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना एका जबाबदार व्यक्तीद्वारे माहिती द्यावी. काही संशय असल्यास संबंधित विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाचे अन्न सुरक्षा आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी केले आहे. (प्रतिनिधी)