शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात पाळीव कुत्र्याचा मुलीला चावा: पिता पुत्राविरुद्ध गुन्हा दाखल

By जितेंद्र कालेकर | Updated: September 23, 2020 16:58 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : हरिनिवास, महादेव टॉवर सोसायटीतील एका पाळीव कुत्र्याने एका २३ वर्षीय तरुणीला चावा घेतल्याचा प्रकार ...

ठळक मुद्दे नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखलदहा महिन्यांनी दाखल झाली तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: हरिनिवास, महादेव टॉवर सोसायटीतील एका पाळीव कुत्र्याने एका २३ वर्षीय तरुणीला चावा घेतल्याचा प्रकार नोव्हेंबर २०१९ मध्ये घडला होता. वारंवार पाठपुरावा करुनही याबाबत नौपाडा पोलीस तक्रार दाखल करीत नव्हते. अखेर मुलीचे वडिल भरतकुमार पिसाट यांनी ठाणे शहर पोलिसांच्या ट्वीटर हॅन्डलवर तक्रार केल्यानंतर याप्रकरणी महेश मोरे आणि त्यांचा मुलगा निरंजन मोरे यांच्याविरुद्ध नौपाडा पोलीस ठाण्यात रविवारी तक्रार दाखल करण्यात आली आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हरी निवास सर्कल येथील महादेव टॉवर सोसायटीतील महेश मोरे यांनी पाळलेल्या कुत्र्याने नाजूका पिसाट (२३) हिला चावा घेतल्याचा प्रकार २५ नोव्हेंबर २०१९ रोजी सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास हा प्रकार नौपाड्यात घडला होता. नाजूका कामावर जात असतांना या कुत्र्याने नाजूकाच्या पायावर चावा घेतला होता. याप्रकरणी तिच्यावर औषधोपचार केल्यानंतर तिचे वडिल भरतकुमार पिसाट यांनी नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला होता. परंतू, पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात टाळाटाळ केल्याचा आरोप पिसाट यांनी केला आहे. वारंवार पाठपुरावा करुनही गुन्हा दाखल होत नसल्यामुळे अखेर याबाबतची तक्रार ठाणे शहर पोलिसांच्या ट्वीटर हॅन्डलवर १९ सप्टेंबर २०२० रोजी पिसाट यांनी केली. हीच तक्रार त्यांनी पोलीस महासंचालकांकडेही केली. याची तात्काळ म्हणजे दुसऱ्याच दिवशी दखल घेण्यात येऊन ठाणे शहर पोलीस आयुक्तांच्या कार्यालयाने २० सप्टेंबर रोजी नौपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले यांच्याकडे ही तक्रार देण्यास सांगितले. त्यानुसार त्यांनी मांगले यांच्याकडे ही कैफियत मांडली. याप्रकरणी अखेर दहा महिन्यांनी कलम २८९, ३३७ नुसार महेश मोरे आणि निरंजन मोरे या पिता पुत्राविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांच्याविरुद्ध लवकरच कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

 ‘‘ भरतकुमार पिसाट यांनी या श्वान दंशप्रकरणी केवळ आॅनलाईन तक्रार अर्ज दिला होता. लॉकडाऊनमुळे ते प्रत्यक्षात पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आले नव्हते. तक्रारीवर त्यांची स्वाक्षरी अपेक्षित होती. कुत्रा चावल्याबाबतचे वैद्यकीय प्रमाणपत्रही त्यांनी दिले नव्हते. यात मोरे यांनी कुत्रे पाळायची परवानगीही घेतलेली नाही. त्यामुळे त्यांच्यावरही कारवाई केली जाणार आहे.’’अनिल मांगले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, नौपाडा 

टॅग्स :thaneठाणेdogकुत्राCrime Newsगुन्हेगारी