शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
5
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
6
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
7
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
8
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
9
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
10
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
11
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
12
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
13
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
14
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
15
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
16
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
17
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
18
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
19
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
20
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरातील वालधुनी नदीची पेट्रोलिंग, नदीच्या पाण्याच्या तीव्र वासाने नागरिक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2020 17:12 IST

उल्हासनगरातून वाहणाऱ्या वालधुनी नदीत टॅंकर माफिया केमिकल सोडत असल्याने, नदी किनाऱ्यावरील हजारो नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले.

सदानंद नाईक 

उल्हासनगर : शहराच्या मधोमध वाहणाऱ्या वालधुनी नदीत केमिकल टाकणाऱ्याचा छेडा लावण्यासाठी पालिका अधिकाऱ्यास ह, प्रदूषण मंडळाचे अधिकारी, पोलिस व स्थानिक नगरसेवकांनी गेल्या दोन दिवसापासून रात्रीला नदी किनारी गुप्तपणे पेट्रोलिंग केली. मात्र हाती काहीच लागले नाही. अखेर प्रदुषण मंडळाचे छडा लावण्याची विनंती नगरसेवक टोनी सिरवानी यांनी केली. 

उल्हासनगरातून वाहणाऱ्या वालधुनी नदीत टॅंकर माफिया केमिकल सोडत असल्याने, नदी किनाऱ्यावरील हजारो नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले. नदी पात्रात केमिकल टाकले जात असल्याने, नदीतील पाण्याला उग्र दर्पाचा वास येवून नागरिकांना चक्कर येणे, डोळे दुखी, उलट्या, त्वचाच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. यापूर्वी असे प्रकार अनेकदा घडल्याने नदी किनाऱ्यावरील नागरिक भीतीच्या छायाखाली आहेत. गेल्या दोन दिवसापासून वालधुनी नदीच्या पात्रातून तीव्र वासात वाढ झाल्याने नागरिकांनी स्थानिक नगरसेवक टोनी सिरवाणी, कविता पंजाबी यांच्याकडे धाव घेतली. त्यांनी महापालिका आयुक्त डॉ राजा दयानिधी यांच्याकडे धाव घेवून झालेला प्रकार कथन केला. तसेच पाण्याच्या तीव्र वासाने नागरिक त्रस्त झाले आहेत.

 महापालिका आयुक्त डॉ राजा दयानिधी यांनी सहायक आयुक्त गणेश शिंपी, मुख्य स्वच्छता निरीक्षक विनोद केनी, एकनाथ पवार यांना बोलावून रात्रीला वालधुनी नदी किनारी पोलिस, स्थानिक नगरसेवक व प्रदुषन‌ मंडळाच्या अधिकारी यांच्या सोबत गस्त घालण्याचे सुचविले. सोमवारी व मंगळवारी रात्री गस्त घातली असुन हाती काहीच लागले नसल्याची प्रतिक्रिया नगरसेवक टोनी सीरवानी यांनी दिली. तसेच नदीचे प्रदुर्षण करणाऱ्यावर कारवाई होण्यासाठी प्रदुषन मंडळाने अधिक सक्रिय होण्याची गरज असल्याची माहिती सिरवानी यांनी दिली. तसेच रात्रीची महापालिकेने गस्त सुरू केल्याची माहिती टँकर केमिकल माफिया यांना खबरी पर्यंत मिळाल्याने गस्त दरम्यान पथकाला काही एक मिळाले नसल्याची माहिती दिली. 

वालधुनी नदी वरदान नव्हे शाप?

 शहरातून जाणारी वालधुनी नदी वरदान ठरण्या ऐवजी शापित निघाल्याची भावना नागरिक व्यक्त करीत आहेत. यापूर्वी नदीतील तीव्र वासाने शेकडो नागरिकांना फटका बसला असुन त्यांना रूग्णालयात उपचार घ्यावे लागले. नदीत केमिकल टाकणाऱ्या टँकर माफियांवर यापूर्वी गुन्हे दाखल झाले. मात्र मोठी कारवाई अध्यापर्यंत झाली नसल्याचा आरोप सिरवानी यांनी केला.

टॅग्स :riverनदी