शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

भाडेकरुच्या घराचा बेकायदेशीर ताबा घेणाऱ्या मालकाला दणका: तिघांचा जामीन फेटाळला

By जितेंद्र कालेकर | Updated: November 22, 2020 19:42 IST

घराचा बेकायदेशीररित्या ताबा घेऊन घरातील संगणकासह एक लाख ४५ हजारांच्या ऐवजाच्या चोरीचा आरोप असलेल्या पाच ते सहा जणांपैकी दर्शन कोळी (५०) त्याची बहिण श्रृंखला बाडकर (४०) आणि मेव्हणे अमित बाडकर (४५) या तिघांचाही अटकपूर्व जामीन अर्ज ठाणे न्यायालयाने शुक्रवारी फेटाळला आहे.

ठळक मुद्देठाणे न्यायालयाचे आदेश नौपाडा पोलीस ठाण्यात दिली होती तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : भाडेकरुच्या घराचा बेकायदेशीररित्या ताबा घेऊन घरातील संगणकासह एक लाख ४५ हजारांच्या ऐवजाच्या चोरीचा आरोप असलेल्या पाच ते सहा जणांपैकी दर्शन कोळी (५०) त्याची बहिण श्रृंखला बाडकर (४०) आणि मेव्हणे अमित बाडकर (४५) या तिघांचाही अटकपूर्व जामीन अर्ज ठाणेन्यायालयाने शुक्रवारी फेटाळला आहे. यातील ग्रिष्मा कोळी यांनी मात्र वयाची सत्तरी गाठल्यामुळे त्यांना दिलासा मिळाला आहे.नौपाडयातील वीर सावरकर पथ येथील ‘दर्शन बिल्डींग’ या इमारतीमधील तिसºया मजल्यावरील क्रमांक ११ मधील खोली रवींद्र वैद्य (४५) यांनी भाडे तत्वावर घेतली आहे. मात्र, ३ ते ५ सप्टेंबर २०२० रोजी दरम्यान ग्रीष्मा कोळी तसेच त्यांचा मुलगा दर्शन कोळी, मुलगी श्रृंखला बाडकर आणि जावई अमित बाडकर यांनी आपसात संगनमत केले. त्यानंतर या खोलीच्या लाकडी दरवाजाचे आणि सेफ्टी दरवाजाचे कुलूप तोडून आत शिरकाव केला. तसेच खोलीतील संगणक आणि ट्रॉली, लोखंडी पलंग तसेच रोजच्या वापरातील भांडी असा एक लाख ४५ हजारांचा ऐवज चोरल्याची तक्रार वैद्य यांनी २० आॅक्टोबर २०२० रोजी नौपाडा पोलीस ठाण्यात केली होती. वैद्य यांना कोळी आणि बाडकर कुटूंबियांनी शिवीगाळ आणि धमकी देऊन बेकायदेशीररित्या खोलीत शिरकाव करुन अतिक्रमण करीत खोलीचा कब्जा घेतल्याचेही या तक्रारीमध्ये म्हटले होते. याप्रकरणाची गंभीर दखल घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले आणि पोलीस निरीक्षक अविनाश सोंडकर यांनी गुन्हा दाखल केला होता. याच प्रकरणात अटकपूर्व जामीनासाठी आरोपींनी ठाणे न्यायालयात अर्ज केला. तेंव्हा आरोपींनी आपण मालक असल्याचा दावा केला. तर तक्रारदार वैद्य यांनी १९७६ पासून भाडेकरु असून लाईटबिल, भाडे आणि मेटनन्सचा भरणा करीत असल्याचे म्हटले. मालकाने बेकायदेशीररित्या घरात शिरकाव करुन वस्तूंचीही चोरी केल्याचा त्यांनी दावा केला. न्यायाधीश शैलेंद्र तांबे यांनी दोन्ही बाजू ऐकल्यानंतर ७० वर्षीय ग्रीष्मा कोळी वगळता इतर तिन्ही आरोपींचा जामीन अर्ज २० नोव्हेंबर रोजी फेटाळला. इमारत जुनी असून रवींद्र वैद्य यांचे वडीलही त्याच खोलीत वास्तव्याला होते. अशा सर्व बाबी सरकारी वकील संध्या जाधव यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्या होत्या. यातील आरोपींना नौपाडा पोलिसांनी आता नोटीस बजावल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीCourtन्यायालय