शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
4
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
5
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
6
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
7
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
8
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
9
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
10
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
11
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
12
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
13
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
14
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
15
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
16
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
17
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
18
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
19
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
20
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
Daily Top 2Weekly Top 5

केडीएमटीच्या अर्थसंकल्पातील तरतुदी राहिल्या कागदावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2020 00:00 IST

लोकप्रतिनिधींकडून भरघोस निधी; पण, पालिकेकडून हात आखडता

- प्रशांत मानेकल्याण : लोकप्रतिनिधींकडून अर्थसंकल्पाच्या माध्यमातून भरघोस निधीची तरतूद केडीएमटीसाठी केली जाते, परंतु केडीएमसीकडून हात आखडता घेतला जात असल्याने त्या तरतुदी कागदावरच राहिल्या आहेत. मागील वर्षी परिवहनकडून अर्थसंकल्प सादर करताना तत्कालीन सभापती सुभाष म्हस्के यांनी महापालिकेच्या असहकार्याबाबत परखड मत मांडले होते. याउपरही परिस्थिती कायम आहे. दरम्यान, शुक्रवारी यंदाचा अर्थसंकल्प स्थायी समितीला सादर केला जाणार आहे. यात परिवहन सभापती मनोज चौधरी काय भाष्य करतात? याकडे लक्ष लागले आहे.केडीएमटी व्यवस्थापनाने सादर केलेल्या अर्थसंकल्पातील तरतुदींमध्ये सात कोटींची वाढ करीत परिवहन समितीने ९८ कोटी ७४ लाख रुपये जमा व ९६ कोटी ६४ लाख रुपये खर्च, अशा दोन कोटी १० लाख रुपयांच्या शिलकी अर्थसंकल्पाला २२ जानेवारीच्या परिवहनच्या विशेष सभेत मान्यता दिली आहे. भांडवली आणि महसुली अनुदानाबरोबरच भविष्य निर्वाह निधीत वाढ करताना मृत कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला तत्काळ २५ हजार रुपये आर्थिक मदत करण्याचा निर्णय यात घेण्यात आला आहे. आता हा अर्थसंकल्प शुक्रवारी स्थायी समितीला सादर केला जाईल. दरम्यान स्थायी समितीकडून महासभा असा प्रवास घडताना लोकप्रतिनिधींकडून केडीएमटीच्या अर्थसंकल्पात मांडल्या गेलेल्या तरतुदींमध्ये भर टाकून भरघोस निधीची तजवीज परिवहन उपक्रमासाठी केली जाते. परंतु, आजवरचा अनुभव पाहता तरतूद केलेला निधी पूर्णपणे उपक्रमाकडे वर्ग होत नाही तर घोषणा झालेले प्रकल्प हे अंमलबजावणीअभावी कागदोपत्रीच राहतात.गतवर्षीच्या अर्थसंकल्पात महासभेने उपक्रमासाठी महसुलीसाठी सहा कोटी व भांडवली खर्चासाठी १८ कोटींची तरतूद केली होती. भांडवली तरतूद मिळाली परंतु, महसुली खर्चासाठी दिलेल्या सहा कोटींच्या तरतुदींमधील वर्षभरात ५० लाखांचा निधी मिळाला आहे. तर, नवीन बस खरेदी, वर्कशॉप व आगारातील सुधारणा, बसथांबे आदी कामासाठी सहा कोटींची तरतूद स्थायीने महासभेला सादर केलेल्या अर्थसंकल्पात केली होती. या व्यतिरिक्त गणेशघाट आगारासाठी ६४ लाख व खंबाळपाडा आगार विकसित करण्यासाठी तीन कोटींची तरतूद केली होती. परंतु, ही कामे सुरू झालेली नाहीत. केडीएमटी लोकाभिमुख करण्याचा संकल्प करण्यात आला होता. मात्र, वारंवार घटत असलेले उत्पन्न पाहता हा उपक्रम किती लोकाभिमुख झाला याची प्रचिती येते.खाजगीकरणाच्या प्रस्तावाकडे दुर्लक्षगेल्या अर्थसंकल्पीय महासभेत भाजपचे नगरसेवक राहुल दामले यांनी केडीएमटीच्या तरतुदींवर भाष्य करताना परिवहनच्या खाजगीकरणाचा मुद्दा उपस्थित केला होता.खाजगीकरण केल्यानंतर ५० ते ६० कोटींची बचत होईल, याकडेही लक्ष वेधले होते. परंतु, आजच्याघडीला खाजगीकरण किंवा ग्रॉस कॉस्ट कॉन्ट्रॅक्ट (जीसीसी) सारख्या तत्सम प्रस्तावाकडेही प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे.