शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर हत्याकांड: लैंगिक अत्याचाराच्या आरोपींचा 'पॅरोल' कायमचा बंद होणार; CM फडणवीसांचे कडक निर्देश
2
ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...?
3
"हे खपवून घेणार नाही..."; पंतप्रधान मोदींनी सुनावलं, UAE वरील हल्ल्यात तीन भारतीय जखमी
4
दिग्गज कंपनी बायोकॉनच्या संस्थापक किरण मजुमदार शॉ यांनी निवडला उत्तराधिकारी; कोणाला देणार कंपनीची धुरा?
5
उत्तर प्रदेशमध्ये स्मार्ट प्रीपेड मीटर फेल झाले! योगी सरकार पुन्हा जुन्या पद्धतीवर आले, एक महिन्याने लाईट बिल देणार
6
'तरुणांच्या आयुष्याशी सरकारचा अक्षरशः खेळ', पोलीस भरती परीक्षेत खासगी पुस्तकातीलच प्रश्न जसेच्या तसे
7
पश्चिम बंगालमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला! 'या' तीन नावांची चर्चा
8
तीन पक्ष, तीन मतदारसंघ, अन् एकाच कुटुंबातील तिघांची बाजी, पत्नी, मुलगा आणि जावई बनले आमदार 
9
सिग्नल तोडण्यापासून ते अतिवेगापर्यंत, दंड माफ होऊ शकतो; मे महिन्यात या दिवशी लोक अदालत भरणार...
10
Latest Marathi News LIVE :पश्चिम बंगालच्या निकालाबद्दल अरविंद केजरीवालांना शंका, 'या' मुद्द्यावर ठेवले बोट
11
पराभवानंतरही टीवीकेसोबत सत्तेत येण्याची काँग्रेसला संधी; तामिळनाडूत सत्ता समीकरण कसं जुळणार?
12
'राजा शिवाजी' सिनेमाचा सीक्वल येणार? रितेश देशमुखने अखेर सांगितलं, म्हणाला- "अजून खूप..."
13
आता शौचालयात जाण्यासाठी फ्लायओव्हर बांधा! भोपाळ मनपाचा कारनामा चर्चेत, लोक संतप्त
14
नेपाळचे नवे पंतप्रधान बालेन शाह यांचा 'ओली' पॅटर्न; भारतासोबत पंगा घेणारे 'हे' २ मोठे निर्णय!
15
'राजा शिवाजी'साठी बॉलिवूड कलाकारांनी किती मानधन घेतलं? रितेश देशमुखचा गौप्यस्फोट, म्हणाला- "अभिषेक बच्चन..."
16
सावधान! अटलांटिक महासागरात मृत्यूचे तांडव; क्रूझवर 'हंताव्हायरस'चा शिरकाव, ३ पर्यटकांचा बळी!
17
स्मार्ट होम की मृत्यूचा सापळा? आग लागताच स्मार्ट लॉक खराब; दरवाजा न उघडल्याने ९ जणांचा बळी
18
एमजीआर, एनटीआर ते विजय... दक्षिणेतील मतदार अभिनेत्यांमध्ये नेता का शोधतात? ही आहेत ५ कारणं
19
बनावट जन्म दाखला घोटाळा: मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून SITद्वारे सखोल चौकशीचे आदेश
20
British Airways: विमान उडवायचं नाही, फक्त जमिनीवर चालवायचंय; 'ही' एअरलाइन कंपनी पायलट्सना देतेय ९५ लाखांची सॅलरी
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यातील उपवन येथे कारवरील नियंत्रण सुटल्याने एकाचा मृत्यु: चालक तरुणी गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2021 23:28 IST

उपवनकडून पवारनगरकडे जाणाऱ्या मोटारकारने रस्त्यावरील एका झाडाला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातामध्ये सुमित ढाकणकर (३३, रा. वसंतविहार, ठाणे) या कारमधील सहप्रवाशाचा मृत्यु झाल्याची घटना बुधवारी पहाटेच्या सुमारास घडली. तर चालक असलेली त्याची मैत्रिण शिवानी भानुशाली या अपघातामध्ये गंभीर जखमी झाली.

ठळक मुद्दे चितळसर पोलीस ठाण्यात गुन्हाकुत्र्याला वाचविण्याच्या प्रयत्नात अपघात झाल्याचा दावा

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: उपवनकडून पवारनगरकडे जाणाऱ्या मोटारकारने रस्त्यावरील एका झाडाला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातामध्ये सुमित ढाकणकर (३३, रा. वसंतविहार, ठाणे) या कारमधील सहप्रवाशाचा मृत्यु झाल्याची घटना बुधवारी पहाटेच्या सुमारास घडली. तर चालक असलेली त्याची मैत्रिण शिवानी भानुशाली (२५, रा. उन्नती वूड, ठाणे) या अपघातामध्ये गंभीर जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.उपवनजवळील विरसा मुंडा चौकाजवळील ओपन जिम भागात रौनक पार्क येथे बुधवारी पहाटे ५.२० वाजण्याच्या सुमारास उपवन कडून पवारनगरकडे शिवानी ही सुमित याच्यासह मोटारकारने जात होती. भरघाव वेगात असलेल्या मोटारकारवरील नियंत्रण सुटल्याने तिची झाडाला जोरदार धडक बसली. या अपघातामध्ये चालक असलेली शिवानी आणि सहप्रवासी असलेला तिचा मित्र सुमित हे दोघेही गंभीर जखमी झाले. दोघांनाही तातडीने एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच सुमितचा मृत्यु झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. चालक शिवानीने मद्य प्राशन केले होते किंवा कसे? याचाही तपास करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. तिच्याविरुद्ध चितळसर पोलीस ठाण्यात हयगयीने वाहन चालवून सुमित याच्या मृत्युस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून तिच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, रस्त्यामध्ये आलेल्या एका कुत्र्याला वाचविण्याच्या प्रयत्नात आपले कारवरील नियंत्रण सुटल्याने कार पदपथावरील एका झाडावर आदळल्याने हा अपघात झाल्याचे जखमी शिवानीने पोलिसांना सांगितले.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीAccidentअपघात