शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

आता लक्ष ठाणे जिल्हा बँक निवडणूक निकालाकडे

By admin | Updated: May 7, 2015 00:21 IST

ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर आपली सत्ता खेचून आणण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा, काँग्रेस आणि शिवसेना यांच्या ‘सहकार’ पॅनलने चांगलीच ताकद पणाला लावली.

जितेंद्र कालेकर, ठाणेठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर आपली सत्ता खेचून आणण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा, काँग्रेस आणि शिवसेना यांच्या ‘सहकार’ पॅनलने चांगलीच ताकद पणाला लावली, तर प्रतिस्पर्धी वसई विकास आघाडीच्या ‘लोकशाही सहकार’ पॅनलनेही त्यांना कडवे आव्हान दिले. विक्रमी मतदान झाल्यामुळे वाढलेली मते सत्ताधाऱ्यांना किती फायदेशीर ठरणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.जिल्ह्याचे सत्ताकारण आणि ‘अर्थकारण’ याच बँकेभोवती फिरत असल्यामुळे या ठिकाणी सत्ता मिळविण्यासाठी सर्वच पक्षांमध्ये नेहमीच चढाओढ असते. माजी अध्यक्ष कपिल पाटील यांच्यासह आमदार किसन कथोरे, राष्ट्रवादीचे नेते वसंत डावखरे, जितेंद्र आव्हाड, माजी पालकमंत्री गणेश नाईक, आ. विष्णू सवरा आणि शिवसेना ठाणे जिल्हा संपर्कप्रमुख तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे या सर्वांनीच निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सर्वपक्षीय ‘सहकार’चे आठ आणि ‘लोकशाही सहकार’चे दोन उमेदवार असे १० बिनविरोध निवडून आले. आता ११ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत सहकारला अवघ्या तीनची गरज असली तरी बहुमताने निवडून येऊ आणि बँकेवरील सत्ताही मिळवू, असा विश्वास ‘सहकार’च्या बाबाजी पाटील, देविदास पाटील, अशोक पोहेकर या माजी अध्यक्षांनी व्यक्त केला आहे. तर, आमचे संपूर्ण पॅनल विजयी होईल, असा दावा लोकशाहीच्या शिवाजी शिंदे यांनी केला आहे. पालघरमधून वासुदेव पाटील, मधुकर पाटील, अनिल गावड तर पगारदारमधून भाऊ कुऱ्हाडे, सावकार गुंजाळ आणि शिवाजी पाटील यांच्यात लढत झाली. खरेदी-विक्री संघातून सीताराम राणे, शिवाजी शिंदे आणि वसंत पोलाडिया यांच्या लढतीकडेही सर्वांचे विशेष लक्ष आहे. या निवडणुकीची ७ मे रोजी ठाण्याच्या वर्तकनगर येथील थिराणी हायस्कूल या शाळेत सकाळी ८ ते दुपारी २ वा. मतमोजणी होणार आहे.