शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

वृत्तपत्र विक्रेत्यांवरच असते वृत्तपत्रांची मदार

By admin | Updated: February 19, 2016 02:25 IST

वृत्तपत्र विक्रेत्यांवरच वृत्तपत्रांची मदार असून त्यांनी वेळेत दिलेल्या सेवेमुळेच चोखंदळ वाचकांच्या हाती ‘महाराष्ट्राचा मानबिंदू’ असलेले सर्वाधिक खपाचे ‘लोकमत’सारखे वृत्तपत्र पडते.

ठाणे : वृत्तपत्र विक्रेत्यांवरच वृत्तपत्रांची मदार असून त्यांनी वेळेत दिलेल्या सेवेमुळेच चोखंदळ वाचकांच्या हाती ‘महाराष्ट्राचा मानबिंदू’ असलेले सर्वाधिक खपाचे ‘लोकमत’सारखे वृत्तपत्र पडते. भल्या पहाटे वाचकांना वृत्तपत्र देण्यासाठी ऊन, वारा, पाऊस यांची तमा न बाळगता विशेष मेहनत घेणारे विक्रेते हे वृत्तपत्रांच्या खपाचे खरे मानकरी असल्याचे कौतुकोद्गार ‘लोकमत’चे वरिष्ठ सहायक संपादक संदीप प्रधान यांनी काढले. त्यांच्या मेहनतीचे कौतुक करून ‘काहीतरी कर ठाणेकर’ या उपक्रमाला दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल त्यांनी सर्व विक्रेत्यांचे विशेष आभार मानले. नौपाड्यातील ‘जयभगवान’ सभागृहात गुरुवारी सकाळी पार पडलेल्या या उपक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ‘लोकमत’चे सहायक उपाध्यक्ष विजय शुक्ला, मुंबई आवृत्तीचे वितरण महाव्यवस्थापक हारुण शेख, ठाणे शाखेचे सहायक महाव्यवस्थापक राघवेंद्र शेट, मुंबई विभागाचे वितरण व्यवस्थापक शरद सुरवसे, पनवेल शाखा व्यवस्थापक सागर गवांडे, ठाणे जिल्हा वृत्तपत्र विक्रेता संघाचे कार्याध्यक्ष राजेश मोरे, सरचिटणीस अजित पाटील तसेच ठाणे जिल्हा वृत्तपत्र विक्रेता सेनेचे अध्यक्ष विष्णू सावंत, सरचिटणीस संतोष विचारे, समीर कोरे आदी पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहायक वितरण व्यवस्थापक सुबोध कांबळे यांनी केले. तर मुकेश मोरे, कांचन माळवे या प्रतिनिधींनी कार्यक्रम यशस्वितेसाठी मेहनत घेतली.नागपूरला वृत्तपत्र विक्रेत्याचा पुतळा ‘लोकमत’ने उभारला आहे. वृत्तपत्र विक्रेत्यांबद्दल लोकमत वृत्तपत्रसमूहाने आत्मीयता दाखवून त्यांची खऱ्या अर्थाने दखल घेतल्याबद्दल राजेश मोरे यांनी या वेळी आभार मानले.विजय कांबळे ठरले केंद्रबिंदू‘काहीतरी कर ठाणेकर’ या उपक्रमांतर्गत सर्वाधिक बक्षिसे पटकावण्याचा मान राबोडी येथील वृत्तपत्रविक्रेते विजय कांबळे यांनी मिळवला. त्यांना स्मार्ट फोन, टॅबलेट, इंडक्शन कुकर, डिनर सेट आणि इस्त्री आदी वस्तू लकी ड्रॉमार्फत मिळाल्या. त्यामुळे या सोहळ्याचे ते एका अर्थाने केंद्रबिंदू ठरले. लोकमतच्या काहीतर कर ठाणेकर या उपक्रमाला प्रतिसाद देणाऱ्या विक्रेत्यांसाठी विशेष स्पर्धा घेण्यात आली होती. त्यातील विजेत्यांची निवड लॉटरी पद्धतीने करण्यात आली आणि विजेत्या विक्रेत्यांचा गुरुवारी लोकमत परिवारातर्फे गौरव करण्यात आला, त्या वेळचे छायाचित्र.