शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
4
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
5
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
6
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
7
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
8
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
9
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
10
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
11
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
12
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
13
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
14
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
15
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
16
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
17
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
18
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
19
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
20
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
Daily Top 2Weekly Top 5

बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

By पंकज पाटील | Updated: April 26, 2025 15:56 IST

Mumbai Local trains badlapur News: फलाट क्रमांक एकवर ग्रील लावल्याने 'पिक अवर'ला लोकल रेल्वेत चढणाऱ्या व उतरणाऱ्यांची प्रवाशांची प्रचंड गर्दी होत आहे. 

- पंकज पाटील, बदलापूर बदलापूर येथे होम प्लॅटफॉर्म प्रवाशांच्या सोयीसाठी नव्हे, तर गैरसोयीसाठी उभारण्यात आल्याची प्रवाशांची भावना बळावत आहे. होम प्लॅटफॉर्ममुळे गर्दी विखुरली जाईल, अशी अपेक्षा असताना रेल्वे प्रशासनाने फलाट क्रमांक १ बंद केल्यामुळे संपूर्ण प्रवाशांची गर्दी आता होम प्लॅटफॉर्मवर होत आहे. त्यामुळे सायंकाळी लोकल होम प्लॅटफॉर्मवर आल्यानंतर प्रवाशांना स्टेशनबाहेर निघण्यासाठी वेळ लागतो. गर्दी प्रचंड झाल्यामुळे चेंगराचेंगरीची भीती वाढली आहे.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

बदलापुरातील होम प्लॅटफॉर्म सध्या बदलापूरकरांसाठीच डोकेदुखी ठरत आहे. या होम प्लॅटफॉर्मची उभारणी करत असताना रेल्वेचे नियोजन चुकल्याचे दिसते. त्यामुळे आता प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. बदलापूर लोकलमधून उतरलेले प्रवासी कर्जत लोकल पकडण्यासाठी रेल्वे रूळ ओलांडत आहेत. 

त्याचवेळी कर्जतहून मुंबईकडे जाणारी मेल, एक्स्प्रेस गाडीखाली येऊन प्रवासी चिरडले जाण्याची दाट शक्यता आहे. वेळेवर लोकल सेवा सुरू असल्यास गर्दी कमी होत राहून चेंगराचेंगरीचा धोका काहीसा कमी होतो.

रेल्वेच्या चुकीच्या नियोजनाचा फटका

४० हजार प्रवाशांची रोज बदलापूर स्थानकातून ये-जा सुरू असते. पण प्रवाशांच्या तुलनेत सुविधांचा अभाव असल्याचे दिसून येते. अधिकाधिक सुविधा देण्यासाठी कामे सुरू असल्याचे सांगण्यात आले.

होम प्लॅटफॉर्म अरुंद

होम प्लॅटफॉर्मची उभारणी करताना जागेअभावी प्रशासनाने हा होम प्लॅटफॉर्म अरुंद उभारला. मात्र, प्रवाशांना दोन्ही ठिकाणी उतरण्याची संधी असल्यामुळे समस्या जाणवली नाही.

आता फलाट क्रमांक १ वर ग्रील लावल्यामुळे होम प्लॅटफॉर्मवर गर्दी वाढली आणि या वाढलेल्या गर्दीमुळे होम प्लॅटफॉर्म अरुंद वाटत आहे. यामुळे दुर्घटना घडू शकते. 

चेंगराचेंगरीची भीती

सायंकाळी होम प्लॅटफॉर्मवर बदलापूर लोकल आल्यानंतर लोकलमधून उतरण्यासाठी प्रवाशांना जागा शिल्लक राहत नाही. संपूर्ण होम प्लॅटफॉर्म तुडुंब भरत असल्यामुळे या ठिकाणी चेंगराचेंगरी होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

टॅग्स :badlapurबदलापूरMumbai Localमुंबई लोकलrailwayरेल्वेViral Videoव्हायरल व्हिडिओIndian Railwayभारतीय रेल्वे