शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत मशिदीत अंदाधुंद गोळीबार; दोन अल्पवयीन संशयितांसह ५ जणांचा मृत्यू, पोलिसांकडून 'हेट क्राईम' घोषित
2
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
3
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
4
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
6
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
7
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
8
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
9
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
10
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
11
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
12
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
13
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
14
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
15
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
16
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
17
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
18
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
19
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
20
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
Daily Top 2Weekly Top 5

मीरा-भाईंदर महापालिकेमध्ये आमदार मेहतांमुळेच महायुती तुटली; प्रताप सरनाईकांचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 08:47 IST

मनमानी वृत्तीमुळे जनता पुन्हा धडा शिकवेल

लोकमत न्यूज नेटवर्क, मिरा रोड : मिरा-भाईंदरमध्ये आमदार नरेंद्र मेहता यांच्या घमेंडी वृत्तीमुळे भाजप-शिंदेसेना महायुती झाली नाही. मेहतांच्या मनमानी वृत्तीमुळे २०१९ला मिरा-भाईंदरच्या जनतेने त्यांना धडा शिकवला होता. तसाच धडा महापालिका निवडणुकीत जनता पुन्हा शिकवेल, असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले. महापालिकेतील मेहतांची मनमानी फक्त शिंदेसेना आणि प्रताप सरनाईकच रोखू शकतो, असे ते म्हणाले.

मिरा-भाईंदर महापालिका निवडणुकीत महायुतीतील भाजप, शिंदेसेना व राष्ट्रवादी (अजित पवार) हे सर्वच पक्ष स्वतंत्रपणे लढत आहेत. भाजपने ८७ जागांवर; तर शिंदेसेनेने ८१ जागांवर उमेदवार दिले असून, राष्ट्रवादीच्या ३४ उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. महायुती तुटल्यानंतर भाजप व शिंदेसेनेत खरी लढत होणार आहे.

सर्व समाजाला दिले स्थान

आमदार मेहता म्हणतात, सर्व समाजाला महापालिकेत संधी देणार भाजपने मराठी भाषिक २४, आगरी समाजास १५, गुजराती १२, राजस्थानी - जैन १४, उत्तर भारतीय १४, पंजाबी १, बंगाली १, दक्षिण भारतीय २, ख्रिश्चन समाजाच्या ४ जणांना उमेदवारी दिली आहे. सर्व समाजाला स्थान दिले असल्याचे भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी सांगितले.

गेल्या वेळेपेक्षा जास्त जागा उत्तर भारतीयांना दिल्या आहेत. सर्व्हेनुसार ज्यांच्यासोबत जनाधार होता, त्यांना पक्षाने न्याय देत उमेदवारी दिली. काही चांगल्या उमेदवारांना उमेदवारी देता आली नाही. बऱ्याच जणांनी माघार घेतली आहे व ज्यांनी नाही घेतले त्यांना समजावून ते पण मागे घेतील. एक जागा आरपीआयच्या उमेदवार निर्मला सावळे आमच्या चिन्हावर लढवणार आहे.

पराभवाच्या भीतीने मुलाला संधी नाही

शिंदेसेनेचे जिल्हाप्रमुख राजू भोईर यांना हरवणार, असा इशारा मेहतांनी दिल्यानंतर सरनाईक म्हणाले की, मेहता यांनी पराभवाच्या भीतीने स्वतःच्या मुलाला उमेदवारी दिली नाही. राष्ट्रवादी (अजित पवार) चे जिल्हाध्यक्ष प्रमोद कांबळे यांनी सांगितले की, पक्षाच्या ३४ उमेदवारांनी निवडणूक रिंगणात लढायची ताकद दाखवली आहे.

शिंदेसेनेची अवहेलना, अपमान सहन करणार नाही

मैत्रीपूर्ण लढायचे होते, तर महायुतीमध्ये हातात हात घालून लढायचे होते. आम्ही हक्काचे मागत होतो, ठाणे पॅटर्नप्रमाणे. मात्र, शिंदेसेनेची अवहेलना आणि अपमान सहन करणार नाही.

शिंदेसेनेने ८१ भारतीय नागरिक उमेदवारांना उमेदवारी दिली आहे. मेहतांनी उमेदवार सांगताना जाती-पातीचा उल्लेख करून समाजात दुफळी माजवण्याचे काम केले आहे.

एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील सर्व जाती-समाजाला एकत्र जोडण्याचे काम करत असताना, मेहता मात्र तोडण्याचे काम करत असून, त्यांच्या अशा राजकारणाचा निषेध करतो.

एकेकाळी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला

मीरा-भाईंदर हा एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. अनेक जण पुन्हा पक्षात परतू लागले आहेत, असे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद कांबळे यांनी सांगितले.
 

English
हिंदी सारांश
Web Title : MLA Mehta Caused Alliance Breakup in Mira-Bhayandar: Pratap Sarnaik

Web Summary : Pratap Sarnaik alleges Narendra Mehta's arrogance caused the Mira-Bhayandar alliance breakup. Sarnaik claims only Shinde Sena can curb Mehta's arbitrariness. Parties are contesting independently. Mehta denies blame, citing diverse candidate selection. Sarnaik accuses Mehta of divisive politics.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका - नगरपालिका निवडणूक २०२६Mira Bhayander Municipal Corporation Electionमीरा-भाईंदर महानगरपालिका निवडणूक २०२६Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुकMira Bhayanderमीरा-भाईंदरpratap sarnaikप्रताप सरनाईकShiv SenaशिवसेनाBJPभाजपाMahayutiमहायुती