शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! भाजपने मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्...
2
राजीनामा देण्यास ममतांचा नकार, निवडणूक निकाल जनतेचा कौल नसून कटकारस्थान
3
आजचे राशीभविष्य ६ मे २०२६: आर्थिक गुंतवणुकीसाठी अनुकूल दिवस, धनलाभ होण्याची शक्यता
4
सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय
5
निश्चय केलेल्या 'विजय'चा विजय! प्रस्थापित गडांना खिंडार पाडणारा 'थलपती'चा झंझावात
6
लैंगिक गुन्ह्यांतील आरोपींना पॅरोल नाकारणारा नवा कायदा येणार; मुख्यमंत्र्यांचे विधि व न्याय विभागाला निर्देश
7
आता सिलिंग जमिनींसाठी १० वर्षांनंतर मोठा दिलासा; जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकार; मोठ्या प्रकरणांना हवी राज्याची मंजुरी
8
नसरापूर लैंगिक अत्याचार; नराधमाला ७ मेपर्यंत कोठडी, विशेष सरकारी वकील नेमणुकीसाठी प्रस्ताव
9
मंत्रालयात कामाच्या धकाधकीत सुरांचा जल्लोष; मधुर गाण्यांनी टळटळीत दुपार झाली संस्मरणीय
10
दुचाकीवर नेला देह, पण ‘ती’ मृत्यूशी झुंज हरली; एटापल्लीतील भयावह वास्तव
11
भोंदूबाबा अशोक खरातला ५ दिवसांची पोलिस कोठडी; शिर्डी जमीन गैरव्यवहार : राहाता न्यायालयाचे आदेश
12
जहाजात अडकलेल्या ५० खलाशांची सुटका; पाळीव प्राण्यांपेक्षाही हीन वागणूक : उच्च न्यायालय
13
मार्कच्या घरी ‘ड्रग्ज’ डिलिव्हरी कोणी केली? क्रिप्टो करन्सीमध्येही झाला नशेचा व्यापार !
14
फ्लेमिंगो तलाव संवर्धनासाठी सिडकोला ‘डेडलाइन’; पाण्याचा प्रवाह रोखला; दोन महिन्यांत अहवाल सादर करा हरित लवादाचे आदेश
15
विमान प्रवाशाच्या बॅगेतील पॉवर बँकचा स्फोट; आग लागताच विमानात उडाली धावपळ, ५ जण जखमी
16
इराणशी युद्धविराम संपलेला नाही; अमेरिकेची स्पष्टोक्ती, हाेर्मुझच्या मार्गातून व्यापारी जहाजांची पाठवणी सुरू
17
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
18
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
19
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
Daily Top 2Weekly Top 5

Vidhan sabha 2019 : अंबरनाथमध्ये नो रजिस्ट्रेशन, नो वोट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2019 01:21 IST

मतदानावर बहिष्कार टाकण्याचे आणि त्यासाठी सोसायटीबाहेर फलक लावण्याचे प्रकार वाढले आहेत.

अंबरनाथ : मतदानावर बहिष्कार टाकण्याचे आणि त्यासाठी सोसायटीबाहेर फलक लावण्याचे प्रकार वाढले आहेत. निवडणुकीचा रंग चढत असताना बॅनरबाजीचीही रंगत वाढत आहे. अंबरनाथमधील मोहन पुरम सोसायटीच्या ज्या जागेवर इमारती उभारल्या, त्या जागेवर वनविभागाची नोंद आल्याने त्यांच्या फ्लॅटची नोंदणी बंद झाली आहे. या समस्येवर तोडगा न निघाल्याने सोसायटीने मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे.कानसई येथील काही भागांवर वनविभागाच्या नोंदी आल्या होत्या. त्यातील बहुतांश सर्वेक्षण क्र मांक हे शेती या व्याख्येत मोडत होते. मात्र तरीही त्यांच्यावर वनविभागाचा शिक्का बसल्याने नोंदणी करण्यात अडथळे येत होते. २००८ सालापासून वनविभागाच्या या शिक्क्यामुळे नोंदणी, हस्तांतरण, खरेदी आणि विक्रीचे व्यवहार ठप्प झाले आहेत. त्याचा नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत येथील मोहन पुरम सोसायटीच्या रहिवाशांनी आक्र मक भूमिका घेतली आहे. नवरात्रोत्सवानिमित्त मोहन पुरम मित्रमंडळाच्या सदस्यांनी मंडपाबाहेर नोंदणी नाही, तर मतदान नाही, अशा आशयाचे फलक लावले आहे. अकरा वर्षांत नोंदणीचा प्रश्न सुटू शकला नाही. त्यामुळे लोकप्रतिनिधींवरचा विश्वास उडाला असल्याची प्रतिक्रि या मंडळाचे अध्यक्ष राजेश नाडकर यांनी व्यक्त केली आहे. या सोसायटीत जवळपास साडेचारशे सदनिका असून, जवळपास ७०० मतदार आहेत. त्यांच्या भावना या माध्यमातून व्यक्त केल्याचे नाडकर यांनी सांगितले.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019ambernath-acअंबरनाथ