In the last 20 days, Thane police repatriated 84,000 workers through ST | गेल्या २० दिवसात एसटीच्या मार्फतीने ठाणे पोलिसांनी केली ८४ हजार मजूरांची घरवापसी

एसटीने दिली मोफत सेवा

ठळक मुद्देपरप्रांतीय मजूरांनी मानले राज्य शासन आणि पोलिसांचे आभारएसटीने दिली मोफत सेवा

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: गेल्या २० दिवसांमध्ये ठाणे पोलिसांनी राज्य परिवहन सेवेच्या (एसटी) बसेसद्वारे तब्बल ८४ हजार ७३४ परप्रांतीय मजूरांची  महाराष्ट्राच्या सीमेपर्यंत घरवापसाी केली. ठाणे पोलीस आणि एसटीने केलेल्या सहकार्याबद्दल या मजूरांनी आता आभार मानले आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या संचारबंदीमुळे मुंबई तसेच ठाण्यातील परप्रांतीय मजूरांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते. गाठीशी असलेला सर्व पैसा संपल्यामुळे त्यांच्या जेवणाचेही हाल होत होते. त्यामुळेच अनेकांनी पायपीट करीत तर कधी मिळेल त्या वाहनाने अगदी जादा पैसे मोजून १५०० ते १८०० किलो मीटरचा प्रवास सुरु केला होता. यात मजूरांचे आणखीनच मोठया प्रमाणात हाल होत होते. शिवाय, सोशल डिस्टसिंगचाही फज्जा उडाला होता. याचीच खंबीर दखल घेत राज्य शासनाने एसटी तसेच काही ठिकाणी रेल्वेने या मजूंराची घरवापसी केली. रेल्वेलाही अनेक अडचणी असल्यामुळे ठाणे आणि भिवंडीतून मोठया प्रमाणात एसटीद्वारे या मजूरांना मध्यप्रदेशच्या सीमेपर्यंत सोडण्यात आले.
१० मे रोजी ३५ बसेसद्वारे ८५२ तर मजूरांना सोडण्यात आले. त्यानंतर ११ मे रोजी ११२ बसेसमधून तीन हजार २२ मजूर, १२ मे रोजी ९४ बसमधून दोन हजार ७९१ मजूरांना सोडण्यात आले. यात सर्वाधिक ३४९ बसमधून आठ हजार ७०० प्रवाशांना २४ मे रोजी सोडण्यात आले. तर २१ मे रोजी २३४ बसेसद्वारा पाच हजार ९२१ प्रवाशांना महाराष्ट्राच्या सीमेवर सोडण्यात आले. १० ते २८ मे या २० दिवसांच्या कालावधीत तब्बल तीन हजार ३५० बसेसमधून ८४ हजार ७३४ प्रवाशांची सुखरुप घरवापसी केल्याची माहिती सूत्रांनी दिली. यासाठी ठाण्यातील परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त सुभाष बुरसे, वागळे इस्टेटचे उपायुक्त अविनाश अंबुरे आणि विशेष शाखेचे उपायुक्त बाळासाहेब पाटील यांच्यासह एसटीच्या ठाणे विभागीय कार्यालयाने विशेष मेहनत घेतली.

Web Title:  In the last 20 days, Thane police repatriated 84,000 workers through ST

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.