शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
2
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
3
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
4
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
5
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
6
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
7
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
8
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
9
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
10
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
12
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
13
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
14
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
15
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
16
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
17
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
18
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
19
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
20
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र निवडणूक 2019: मनसेचं 'कल्याण'; शेवटच्या क्षणी 'इंजिन' धावलं, खातं उघडलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2019 16:09 IST

Kalyan Rural Vidhan Sabha Election Results 2019: मनसेला केवळ एका मतदारसंघात यश

कल्याण: सक्षम विरोधी पक्ष म्हणून संधी द्या, असं आवाहन करणाऱ्या मनसेला केवळ एका जागेवर यश मिळालं आहे. कल्याण ग्रामीणमध्येमनसेच्याराजू पाटील यांनी शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव केला आहे. कल्याण ग्रामीण मतदारसंघात शिवसेना आणि मनसेमध्ये चुरशीचा संघर्ष पाहायला मिळाला. अखेर यामध्ये राजू पाटील यांनी बाजी मारली आणि मनसेला भोपळा फोडण्यात यश आलं. सकाळी मतमोजणीला सुरुवात होताच राजू पाटील यांनी आघाडी घेतली होती. शिवसेनेच्या रमेश म्हात्रेंनी त्यांना कडवी टक्कर दिली. अनेकदा राजू पाटील आणि रमेश म्हात्रे यांच्या मतांमध्ये अवघ्या काही शे मतांचा फरक दिसत होता. अखेर राजू पाटील यांनी बाजी मारली. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत मनसेनं पहिल्या विजयाची नोंद केली. मनसेला कल्याण ग्रामीणमध्ये यश मिळेल, अशी शक्यता अनेकांनी व्यक्त केली होती.मनसेनं 2009 मध्ये पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढवली. त्यावेळी मनसेला तब्बल 13 जागांवर यश मिळालं होतं. विशेष म्हणजे मुंबईत मनसेनं शिवसेनापेक्षा जास्त जिंकल्या होत्या. अनेक मतदारसंघात मनसेनं शिवसेना, भाजपाला धक्का दिला होता. मात्र त्यानंतर मनसेची कामगिरी खालावली. 2014 मध्ये मोदी लाटेत मनसे सपाट झाली. त्यावेळी पक्षाचा केवळ एकमेव उमेदवार विजयी झाला. जुन्नरमध्ये शरद सोनावणे निवडून आले. मात्र त्यांनीही नंतर शिवबंधन बांधत पक्षाला सोडचिठ्ठी दिली. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019kalyan-rural-acकल्याण ग्रामीणMNSमनसेRaju Patilराजू पाटीलShiv Senaशिवसेना