शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णालयाचे बायोमेडिकल वेस्ट घंटागाडीत; पनवेलमधील धक्कादायक प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2019 00:43 IST

सिडको कॉलनीत अनेक ठिकाणी उपयोगात आणलेले वैद्यकीय साहित्य फेकून दिले जाते. हे साहित्य उघड्यावर टाकले जाते.

- अरुणकुमार मेहत्रेकळंबोली : सिडको कॉलनीत अनेक ठिकाणी उपयोगात आणलेले वैद्यकीय साहित्य फेकून दिले जाते. हे साहित्य उघड्यावर टाकले जाते. यासंदर्भात यापूर्वी अनेकदा वाद निर्माण झाला आहे. असे असतानाच आता पनवेल उपजिल्हा रुग्णालयातील बायोमेडिकल वेस्ट घंटागाडीत टाकले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे घंटागाडीवर काम करणाऱ्या सफाई कामगारांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, या हलगर्जीपणाबाबत महापालिकेचे आरोग्य विभाग संबंधित रुग्णालयाच्या विरोधात काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

बायोमेडिकल वेस्टची स्वतंत्रपणे विल्हेवाट लावण्याच्या सूचना आहेत. त्याबाबत वेगळी नियमावलीही आहे. मात्र, यानंतरही अनेकदा बायोमेडिकल कचरा उघड्यावर टाकला जात असल्याचे प्रकार घडले आहेत. बायोमेडिकल कचरा आरोग्यास घातक आहे. पनवेल परिसरातील खासगी रुग्णालयातील बायोमेडिकल कचरा मुंबई वेस्ट मॅनेजमेंटच्या माध्यमातून उचलला जातो. तळोजा येथील क्षेपणभूमीवर या कचºयावर प्रक्रिया केली जाते.

बायोमेडिकल कचरा उघड्यावर टाकला जाणार नाही, तसे आढळल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे अनेक खासगी दवाखान्यात निर्माण झालेल्या कचºयाची मुंबई वेस्ट मॅनेजमेंटच्या माध्यमातून विल्हेवाट लावली जाते. त्याप्रमाणे त्यांच्याकडे रजिस्टरसुद्धा मेंटेन केले जाते. याकरिता संबंधित कंपनीला हॉस्पिटलकडून पैसे द्यावे लागतात. हा खर्च वाचविण्यासाठी काही खासगी रुग्णालये आपला वैद्यकीय कचरा छुप्या पद्धतीने घंटागाडीत टाकत असल्याचे समोर आले आहे.

पनवेल परिसरात मागे घडलेल्या अशा प्रकारच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने कठोर मोहीम सुरू केली आहे. मात्र, पनवेल उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय कचरा आता थेट घंटागाडीत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. शनिवारी घंटागाडी कामगारांनीच हा प्रकार उघडकीस आणल्याचे सांगण्यात आले. या कचºयात सलाईनच्या बाटल्या, सिरीन तसेच सुई व इतर वैद्यकीय साहित्य आढळून आले आहे. त्यामुळे याविरोधात पनवेल महानगरपालिका आणि प्रदूषण नियंत्रण महामंडळ कारवाई करेल का? असा प्रश्न विचारला जात आहे.

घंटागाडीमध्ये उपजिल्हा रुग्णालयातून जर बायोमेडिकल वेस्ट टाकले जात असेल तर त्याची माहिती घेतली जाईल आणि त्यांच्यावरही कारवाई केली जाईल.- शैलेश गायकवाड, आरोग्य निरीक्षक, पनवेल महानगरपालिका

टॅग्स :doctorडॉक्टरHealthआरोग्य