शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण-डोंबिवलीमध्ये पक्षप्रवेशाचा घोडेबाजार तेजीत, शिंदेसेना-भाजपचे एकमेकांवर पैशांच्या आमिषाचे आरोप

By अनिकेत घमंडी | Updated: December 5, 2025 10:05 IST

Shinde Shiv Sena Vs BJP: भाजप महापौरपदाचे, पैशांचे आमिष दाखवून प्रवेश करवून घेतले जात असल्याचा आरोप केला होता. त्यावर शिंदेंच्या शिवसेनेकडून २ ते ५ कोटींची ऑफर दिली जात खळबळजनक आरोप भाजपने केला आहे.

अनिकेत घमंडी, डोंबिवली निवडणूक आली की तिकीट किंवा उमेदवारीसाठी घोडेबाजार होतो. मात्र कल्याण-डोंबिवलीत पक्ष प्रवेशावरून घोडेबाजार तेजीत असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. शिंदेसेनेचे कल्याण उपजिल्हाप्रमुख राजेश कदम यांनी पत्रकार परिषदेत भाजप महापौरपदाचे, पैशांचे आमिष दाखवून प्रवेश करवून घेतले जात असल्याचा आरोप केला होता. शिंदेसेनेच्या आरोपांना उत्तर देताना त्यांच्या पक्षात जाण्यासाठी २ ते ५ कोटींची ऑफर दिली जात असल्याचे प्रत्युत्तर भाजपचे कल्याण जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी दिले.

महापालिका निवडणुकांचे बिगुल वाजताच दोन्ही पक्षांत विरोधी पक्षासह माजी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांना घेण्यावरून रस्सीखेच सुरू आहे. दर आठवड्याला दोन्ही पक्ष एकमेकांना धक्के देण्यासाठी कंबर कसून आहेत. आता मनसेचे नगरसेवक कोणाच्या गळाला लागतात याची राजकीय वर्तुळात उत्सुकता लागली आहे. दोन्ही पक्षांच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी एकमेकांवर बुधवारी पत्रकार परिषद घेऊन घोडेबाजार कसा सुरू आहे हे सांगत आरोप-प्रत्योरापांच्या फैरी झाडल्या. 

कल्याणमध्ये काँग्रेसचे माजी नगरसेवक सचिन पोटे हे काय भूमिका घेतात याकडेही दोन्ही पक्षांचे लक्ष लागले आहे. मात्र, करोडो रुपयांचे किंवा पदाचे आमिष दाखवून प्रवेश दिले जात असतील तर यापुढे पक्षप्रवेश करणाऱ्यांची अपेक्षा वाढणार असल्याची चर्चा आहे. 

युती धर्माचे आदेश पाळणार का? 

शिंदेसेनेसह भाजपकडून माजी नगरसेवकांवर गळ टाकण्यासाठी वरिष्ठ पातळीवर फोन करणे, प्रत्यक्ष भेट घेणे असे प्रकार याआधी झाले असल्याचे दोन्ही पक्षांच्या स्थानिक नेत्यांचे म्हणणे आहे. मात्र बुधवारी युती धर्म पाळण्यावरून दोन्ही पक्षनेत्यांनी त्यांच्या पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. त्यामुळे ते आदेश आणखी किती दिवस पाळले जातात हेही बघावे लागणार आहे.

प्रवेशानंतर मिळणार तरी काय? अनेकांना उत्सुकता

पक्षात येणाऱ्यांना काय मिळणार तसेच सध्या वेटिंगवर असलेल्या लोकप्रतिनिधींमध्येही कोणत्या पक्षात गेल्यास काय मिळणार याचीच चर्चा सुरू असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : Kalyan-Dombivli: Horse-trading for party entry intensifies, accusations fly between Shinde Sena, BJP.

Web Summary : Kalyan-Dombivli witnesses intense horse-trading for party entries. Shinde Sena accuses BJP of offering inducements, while BJP alleges counter-offers. Both parties vie for ex-corporators, fueling speculation about future political alignments and expectations.
टॅग्स :Shiv SenaशिवसेनाMahayutiमहायुतीBJPभाजपाEknath Shindeएकनाथ शिंदेRavindra Chavanरविंद्र चव्हाण