शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

भिवंडी तालुक्यात शिवसेना, भाजपची बाजी; २० ग्रामपंचायतीवर शिवसेनेचे वर्चस्व, १४ भाजपच्या ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2021 8:56 AM

भिवंडी तालुक्यातील निकालात शिवसेनेने बहुसंख्य ठिकाणी यश मिळविले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने तीन, काँग्रेसने एक तर श्रमजीवी संघटनेने दोन ग्रामपंचायतींवर वरचष्मा राखला. स्थानिक पातळीवरील ग्रामविकास कमिटीने १३ ठिकाणी यश मिळविले आहे.

वज्रेश्वरी :भिवंडी तालुक्यातील ५३ ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेने बाजी मारली आहे. तालुक्यातील तब्बल २० ग्रामपंचायतींवर शिवसेनेने वर्चस्व मिळविले आहे, तर १४ ठिकाणी भाजपने सत्ता बाजी मारली आहे. राष्ट्रवादीला तीन ठिकाणी, तर श्रमजीवी संघटनेला दाेन ठिकाणी यश मिळाले आहे. भाजपच्या खासदारांनी मात्र ३० ग्रामपंचायतींवर वर्चस्व मिळवल्याचा दावा केला आहे.   भिवंडी तालुक्यातील निकालात शिवसेनेने बहुसंख्य ठिकाणी यश मिळविले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने तीन, काँग्रेसने एक तर श्रमजीवी संघटनेने दोन ग्रामपंचायतींवर वरचष्मा राखला. स्थानिक पातळीवरील ग्रामविकास कमिटीने १३ ठिकाणी यश मिळविले आहे. काल्हेर ग्रामपंचायतीवर सर्वच्या सर्व १७ सदस्य निवडून आणत भाजपने एकहाती सत्ता प्रस्थापित केली आहे. खासदार कपिल पाटील यांच्या दिवे अंजूर गावात त्यांना सत्ता राखण्यात यश आले. शेतकरी संघटनेने त्यांना कडवी लढत देत तीन सदस्य निवडून आणले आहेत. तर पडघा ग्रामपंचायत निवडणूक दोन्ही पक्षांनी प्रतिष्ठेची केली असताना शिवसेनेने यश मिळविले तर मनसेने निर्णायक यश मिळविले असून भाजपला मोठे अपयश आले आहे.

चाेख पाेलीस बंदाेबस्त- भिवंडी शहरातील भादवड येथील स्व. संपदा नाईक सभागृहात सकाळी तहसीलदार अधिक पाटील यांच्या उपस्थितीत २५ टेबलवर मतमोजणीस सुरुवात झाली. निकाल ऐकण्यासाठी या परिसरात उमेदवारांच्या समर्थकांनी गर्दी केली होती. - या संपूर्ण परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त असतानाच विजयी उमेदवारांनी कोणत्याही प्रकारे जल्लोष अथवा मिरवणूक न काढता घरी जावे, यासाठी संबंधित पोलीस ठाण्यातील कर्मचारी नोटिसा बजावत होते.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतthaneठाणेbhiwandiभिवंडीShiv SenaशिवसेनाBJPभाजपा