शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: पश्चिम बंगालमध्ये भाजपा सरकार स्थापन करणार; ममता बॅनर्जींसोबत 'खेला होबे'
2
मोठी घडामोड! काँग्रेस केरळनंतर दुसऱ्या राज्यातही सत्तास्थापन करणार? थलापती विजयच्या वडिलांचे निमंत्रण
3
Success Story: एकेकाळी काँक्रिटच्या जमिनीवर झोपायचे लक्ष्मी मित्तल; आता ₹२७०००० कोटींची नेटवर्थ, IPL टीमचेही बनले मालक
4
बंगालमध्ये बाबरी मशीद बांधणारे हुमायूं कबीर २ जागांवर लढत होते, निकालात त्यांचे काय झाले?
5
Airplane Accident: लँडिंग करतानाच विमानाची ट्रकला धडक; न्यूयॉर्क विमानतळाजवळील घटनेचा व्हिडीओ बघा
6
Baramati Result 2026: सुनेत्रा पवारांना रेकॉर्डब्रेक मतदान; अजित पवारांचा विक्रम मोडत जादुई आकडा पार, एकतर्फी विजयाच्या दिशेने वाटचाल
7
ममता बॅनर्जी वि. सुवेंदू अधिकारी...! भवानीपूरमध्ये आतापर्यंत सात फेऱ्या झाल्या, प्रत्येक फेरीचा निकाल आला...
8
'तीन'वरून ७७ वर आणि आता थेट १९०+ आमदार! भाजपाचा थक्क करणारा 'सक्सेस रेट'; पश्चिम बंगालमध्ये कसं फुललं 'कमळ'
9
असह्य वेदना पण लेकाने शिकावं ही एकच इच्छा; माऊलीचा 'हा' Video पाहून पाणावतील डोळे
10
तृणमूल काँग्रेस पराभवाच्या उंबरठ्यावर, ममता बॅनर्जी हताश, पण सोडली नाही विजयाची आस, कार्यकर्त्यांना केलं असं आवाहन
11
पाकिस्तानने संधीचं सोनं केलं! इराणच्या मजबुरीचा फायदा घेत खोऱ्यानं पैसा ओढला; आता पडणार नोटांचा पाऊस!
12
Numerology: 'या' जन्मतारखेचे लोक असतात अति संवेदनशील; सभोवतालच्या वातावरणाचा खोलवर होतो परिणाम
13
थलापती विजयचे राज्यभरात ८५ हजार फॅन क्लब्स; TVK च्या विजयात निभावली सर्वात मोठी भूमिका
14
आसनसोलमध्ये तृणमूलच्या कार्यालयात तोडफोड, बॉम्ब सापडला; ममता बॅनर्जींच्या घराबाहेर 'जय श्री राम'च्या घोषणा
15
केरळमध्ये 'या' पक्षाने अवघ्या २७ जागा लढवल्या, त्यातील २३ जागांवर पुढे; २१ उमेदवार मुस्लीम
16
Thalapathy Vijay Net Worth: अभिनेता ते राजकारणी; ६०० कोटींपेक्षा अधिकचं साम्राज्य, कशी आहे थलापति विजय यांची लक्झरी लाईफ 
17
लग्नानंतर सासरची पायरी चढण्याआधीच मोडला संसार! २०० रुपयांच्या नोटेमुळे नवरदेवाचा असा झाला भांडाफोड
18
तीन राज्यं जिंकली, पण दोन राज्यांत भाजपाची निराशा; भोपळा फोडला, पण हवं तसं 'कमळ' फुलेना!
19
दाक्षिणात्य सुपरस्टार विजयला 'थलापती' का म्हणतात? जाणून घ्या ३२ वर्षे जुनी कहाणी!
20
IPL 2026: RCBला मोठा धक्का! तुफान घोडदौड सुरू असताना स्टार खेळाडू संघ सोडून घरी परतला
Daily Top 2Weekly Top 5

खेळाडूच्या सतर्कतेमुळे वाचले तरुणीचे प्राण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2019 00:40 IST

नैराश्यामुळे विहिरीत उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका तरुणीला राष्ट्रीय खेळाडू प्रशांत चव्हाण याने वाचविले.

कल्याण : नैराश्यामुळे विहिरीत उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका तरुणीला राष्ट्रीय खेळाडू प्रशांत चव्हाण याने वाचविले. तरुणीची वेळ आली होती, पण काळ आला नव्हता, अशी प्रतिक्रिया परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली.एअर इंडियामध्ये कामाला असलेला प्रशांत शनिवारी दुपारी २ च्या सुमारास ओम कबड्डी संघाच्या मैदानामध्ये आला होता. यावेळी विलेपार्ले येथे राहणारी एक तरुणी मैदानाजवळच्या विहिरीजवळ बसली होती. एक अनोळखी मुलगी विहिरीजवळ बसल्याने प्रशांतने तिला तेथे बसण्याचे कारण विचारले असता, थकवा आल्याने इथे जरा वेळ थांबणार असल्याचे रीनाने सांगितले. मात्र, मुलीच्या शाळेत पालक सभा असल्याने प्रशांत तिथून निघून गेला. सभा संपल्यानंतर घराकडे निघालेल्या प्रशांतला घोडेकर मावशीने फोन केला. ज्या मुलीची विचारपूस त्याने केली, त्या मुलीने विहिरीत उडी मारल्याचे त्यांनी सांगितले. प्रशांत विहिरीजवळ पोहोचला, तेव्हा रीनाने विहिरीतील दोरीला पकडले होते. प्रशांतने विहिरीत उडी मारून रीनाला बाहेर काढले.दरम्यान, याबाबतची माहिती प्रशांत व त्याच्या मित्राने बाजारपेठ पोलिसांना दिली. पोलिसांनी रीनावर रुक्मिणीबाई रुग्णालयात प्राथमिक उपचार केले. त्यानंतर, मुंबईतील रुग्णालयात दाखल करत तिच्या कुटुंबीयांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी रविवारी रीनाला तिच्या कुटुंबीयांच्या ताब्यात दिले. यावेळी, प्रशांत तसेच पोलिसांचे रीनाच्या कुटुंबीयांनी आभार मानले.

टॅग्स :dombivaliडोंबिवली