ठाण्यात चार दुकानांना आग; कोणतीही जीवितहानी नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2021 09:50 IST2021-03-07T09:50:06+5:302021-03-07T09:50:21+5:30

सुदैवाने या  आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र मोठ्या प्रमाणात  वित्तहानी झाली आहे.

Fire at four shops in Thane; No casualties | ठाण्यात चार दुकानांना आग; कोणतीही जीवितहानी नाही

ठाण्यात चार दुकानांना आग; कोणतीही जीवितहानी नाही

ठाणे: ठाणे शहरात गेल्या काही दिवसांपासून आगीचे सत्र सुरू आहे. त्यातच रविवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास वसंत विहार येथील नूपुर इमारतीच्या तळ मजल्यावर असलेल्या चार दुकानांना आग लागली आहे. या आगीत चारही दुकानांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामध्ये दोन दुकाने सुपर मार्केटची असून एक स्टेशनरी आणि आणखी एक कपड्याचे दुकान आहे. सुदैवाने या  आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र मोठ्या प्रमाणात  वित्तहानी झाली आहे.

आगीची माहिती मिळताच ठाणे महापालिका अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे अधिकारी- कर्मचाऱ्यांसह पोलिसांनी धाव घेतली. तसेच आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी १ फायर वाहन, १जम्बो पाण्याचा टँकर आणि १ रेस्क्यू वाहन पाचारण केल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.

Web Title: Fire at four shops in Thane; No casualties