शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना पळवून पळवून मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले... 
2
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
3
Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चांना पूर्णविराम; केंद्र सरकारचा मोठा खुलासा
4
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
5
आता खासगी शाळांमध्येही फक्त NCERT पुस्तके, महागड्या पुस्तकावर बंदी; NHRC ने राज्यांना दिला ३० दिवसांचा वेळ
6
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
7
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
8
Trinamool Congress vs BJP: तृणमूल अन् भाजप यांच्यात थेट लढत; ‘तिसरी आघाडी’मुळे कोणाचा स्वप्नभंग
9
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
10
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
11
तामिळनाडूमध्ये ५.७३ कोटी मतदार ठरवणार ४,०२३ उमेदवारांचे भवितव्य, 'या' जागांवर सर्वांची नजर
12
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
13
वरातीदरम्यान, कुत्र्याचा धुमाकूळ, ६० जणांचा घेतला चावा, वाचण्यासाठी वऱ्हाड्यांची पळापळ  
14
ताडगोळ्यांना इंग्रजीत काय म्हणतात माहीत आहे का? हे पाणीदार फळ कुणी खावं, कुणी टाळावं?
15
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
16
पैसा, प्लॉट, घर गेले, मातृछत्रही हरवले, ‘त्या’ शहीदपुत्राची हृदयद्रावक कहाणी! नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
17
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
18
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
19
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
20
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

अखेर प्रिती भावरच्या मारेक-याला अटक: ठाणे ग्रामीण पोलिसांची कारवाई

By जितेंद्र कालेकर | Updated: October 3, 2019 22:53 IST

भिवंडीतील घोटगाव, गोठणपाडा गावातील प्रीती भावर (२८) या महिलेवर लैंगिक अत्याचार करुन तिचा खून करणारा तिचाच नातेवाईक असल्याचे तपासात समोर आले आहे. रमेश लाडक्या भावर (५०) असे याप्रकरणी अटक केलेल्या तिच्या सास-याचे नाव आहे. ठाणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने त्याला नुकतीच अटक केली.

ठळक मुद्देअत्याचार करुन खून करणार निघाला जवळचा नातेवाईकस्थानिक गुन्हे शाखेने केला कौशल्याने तपासगेल्या १५ दिवसांपासून सुरु होता तपास

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: भिवंडी तालुक्यातील महाळुंगे गावच्या प्रिती भावर (२८) या महिलेवर अत्याचार करुन अमानुषपणे खून करणा-या रमेश लाडक्या भावर (५०) याला ठाणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने नुकतीच अटक केली आहे. त्याला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.कामावरुन परतणा-या प्रिती या महिलेला रस्त्यात अडवून तिला निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर १५ सप्टेंबर रोजी अमानुष अत्याचारानंतर निर्घृण खून करण्यात आला होता. याप्रकरणी गणेशपुरी पोलीस आणि ठाणे ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने सर्व पातळयांवर तपास यंत्रणा सक्रीय केली होती.तिच्या खून्यांना तात्काळ अटकेच्या मागणीसाठी जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी २० सप्टेंबर रोजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गृहराज्यमंत्री दीपक केसरकर, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड यांची भेट घेऊन यातील आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली होती. या घटनेची अत्यंत गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक राठोड, अतिरिक्त पोलीस अधीक्षक संजय पाटील आणि स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्यंकट आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक परशुराम लोंढे, गणपत सुळे, उमेश ठाकरे, पोलीस नाईक हणमंत गायकर, अमोल कदम आणि पोलीस कॉन्स्टेबल रवी राय आदींच्या पथकाने १ आॅक्टोंबर रोजी रमेश भावर याला ताब्यात घेतले. तिचे त्याच्याशी सासºयाचे नाते आहे. त्याची तिच्यावर अनेक दिवसांपासून वाईट नजर होती. १५ सप्टेंबर रोजीही तो गोठगाव भागातील जंगलातच घुटमळत होता, अशी माहिती या पथकाला मिळाल्यानंतर त्याची त्या दिवशीची संपूर्ण दिनचर्या पोलिसांनी पडताळली. त्याने दिलेल्या माहितीमध्ये विसंगती आढळल्यानंतर पोलिसांनी आपल्या खास शैलीत त्याला बोलते केले. त्यानंतर आपल्याकडून ही आगळीक झाल्याची त्याने कबूली दिली.........................काय घडला होता प्रकारवालीव येथे कामाला जाणारी प्रिती ही विवाहिता १५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घरी पायी जात होती. त्यावेळी गोठगाव परिसरात रमेश याने तिला गाठले. तिला जंगलाच्या बाजूने नेत तिच्यावर त्याने लैंगिक अत्याचार केला. तिने विरोध केल्याने तसेश आपले बिंग फुटू नये म्हणून त्याने तिचे डोके दगडावर आपटले. यात ती बेशुद्ध पडल्यानंतर तिच्याच साडीने तिला गळफास देऊन तिची हत्या केल्याची त्याने कबूली पोलिसांना दिली. पती आणि पाच वर्षांची मुलगी तिच्या मागे असून सामान्य घरातील या महिलेचा अत्याचारानंतर निर्घृण खून झाल्याने संपूर्ण ठाणे जिल्हयात संताप व्यक्त होत होता.गणेशपुरी विभागाचे पोलीस उपअधीक्षक दिलीप गोडबोले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक महेश सागडे यांचे पथकही या प्रकरणाचा समांतर तपास करीत होते.पोलिसांनी सखोल तपास करीत आरोपीला अटक केल्याने प्रितीच्या मारेकºयांच्या अटकेसाठी पाठपुरावा करणाºया जिजाऊ महिला सक्षमीकरण प्रमुख मोनिका पानवे यांनी समाधान व्यक्त केले आहे. पोलिसांच्या कारवाईने महिलांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होईल, असे झडपोली येथील जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या सदस्या भावना घाटाल यांनी म्हटले आहे.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीMurderखून