शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

इंग्रजी माध्यमातील पाल्य आणि पालक यांचे गोत्र सूत्र जुळत नाही : विश्वास पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2025 21:43 IST

या निमित्ताने ज्येष्ठ कवी अशोक बागवे यांनी त्यांची मुलाखत घेतली.

लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: मराठी साहित्य,संस्कृती धोक्यात आहे. मराठी शाळेच्या बाबत खूप गांभीर्याने विचार करावा लागेल. इंग्रजी माध्यमात पाल्य टाकली जातात,.ती शिकून मोठी होतात पण खेड्यापाड्यातील शेतकरी किंवा मराठी शाळेत जाणारे विद्यार्थी आणि आई वडील यांचं गोत्र आणि सूत्र जसे जुळते तसे इंग्रजी माध्यमातील पाल्य आणि पालक यांचे गोत्र आणि सूत्र जुळत नाही असे स्पष्ट मत ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील यांनी शुक्रवारी ठाण्यात व्यक्त केले.

कोकण मराठी साहित्य परिषद, ठाणे जिल्हा शाखा आणि आनंद विश्व गुरुकुल महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने पाटील यांचा सत्कार कोमसाप संस्थापक अध्यक्ष पद्मश्री मधू मंगेश कर्णिक यांच्या हस्ते आनंद विश्व गुरुकुल लॉ कॉलेजमध्ये संपन्न झाला. या निमित्ताने ज्येष्ठ कवी अशोक बागवे यांनी त्यांची मुलाखत घेतली. पाटील पुढे म्हणाले की,  जर तुम्हाला उत्तम लेखक किंवा कवी व्हायचे असेल, लोकांच्या चिरस्मरणात रहावे असे वाटत असेल तर उत्तम लेखनाला पर्याय नाही . जोपर्यंत उत्तम झालेले आहे हे आपल्या लक्षात येत नाही तोपर्यंत लिहिणे गरजेचे आहे असे ते म्हणाले . यावेळी पाटील यांनी त्यांच्या विविध कादंबरी लेखनाचा प्रवास उलगडला. अण्णाभाऊ साठे यांनी महानगरी साहित्याचा पाया घातला असल्याचे नमूद केले. 

मी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष झालो होतो तेव्हा विश्वास साहित्य संमेलनाचा अध्यक्ष होईल असे भाकीत केले होते ते आज खरे ठरले आहे असे यावेळी कोमसाप संस्थापक अध्यक्ष पद्मश्री कर्णिक यांनी नमूद केले. साहित्यात राजकारण असू नये . विश्वास पाटील यांनी उत्तम साहित्य लिहिले आहे. त्यांनी अजून पुस्तके लिहून महाराष्ट्राला उपकृत करावे असे आवाहन त्यांनी केले. प्रशासकीय सेवेत असताना पाटील यांनी साहित्यात चौफेर फटकेबाजी केली आहे असे गौरवोद्गार काढत चांगले साहित्य निर्माण होण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे असे को.म.सा.प विश्वस्त आ. संजय केळकर यांनी व्यक्त केले. यावेळी गझलकार दिलीप पांढरपट्टे, को.म.सा.प केंद्रीय अध्यक्ष नमिता कीर, को.म.सा.प केंद्रीय कार्याध्यक्ष डॉ.प्रा.प्रदीप ढवळ, को.म.सा.प ठाणे जिल्हाध्यक्ष बाळ कांदळकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

English
हिंदी सारांश
Web Title : English-medium kids, parents disconnected culturally: Vishwas Patil's concern.

Web Summary : Marathi literature faces threat. English-medium education disconnects children from Marathi culture, parents. Veteran writer Vishwas Patil expressed concern in Thane, emphasizing the need for quality writing to leave a lasting impact.
टॅग्स :Vishwash Patilविश्वास पाटील