शहरं
Join us  
Trending Stories
1
नीट पेपरफुटीचा भंडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
2
"शुक्रवार, शनिवार किंवा रविवार..." इराणवर पुन्हा होणार मोठा हल्ला; डोनाल्ड ट्रम्प यांनी केले जाहीर
3
BRICS Summit 2026: तब्बल ७ वर्षांनंतर शी जिनपिंग भारतात येणार! दिल्लीतील ब्रिक्स परिषदेला पुतिन यांचीही उपस्थिती असणार
4
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
5
मोटेगावकर पेपरफुटीविरोधात लढत होता, आता स्वतःच आरोपी बनला...
6
संपादकीय: बांधावर घोंगावणारे वादळ, वेळीच नाही ओळखले तर...
7
नाश्ता महागला; पाव, ब्रेडच्या किमतीत १०% वाढ
8
आजचे राशीभविष्य, २० मे २०२६: आजचा दिवस आर्थिक दृष्टया लाभदायी, पण अवैध कामासून राहावे लागेल दूर; कोणत्या राशींच्या लोकांनी घ्यावी काळजी?
9
१९ जिल्हे ४५ अंश सेल्सिअस पार, जलसाठे घटताहेत; मंत्रिमंडळ बैठकीत चिंता
10
आयएएस तुकाराम मुंढे आता ‘अन्न व औषधी प्रशासन’च्या आयुक्तपदी, २१ वर्षांत २५ वी बदली; आणखी तीन बदल्या
11
मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआय चौकशी; विदर्भातील ३ उमेदवारांच्या घराची झाडाझडती
12
महाराष्ट्राचे अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात मोठे पाऊल, साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक
13
भोंदू खरातला ‘ईडी’कडून अटक; कोट्यवधींचे मायाजाल उलगडणार
14
‘ईपीएफ’चे पैसे ‘यूपीआय’द्वारे काढता येणार; तांत्रिक चाचणी यशस्वी
15
शिंदेसेनेच्या नगरसेवकांना १५४ कोटी; भाजपच्या वाट्याला केवळ ३ कोटी
16
नालेसफाईच्या ठेक्यात १५ टक्के लाचेची मागणी; एपीएमसी उपसचिव अडकला एसीबीच्या जाळ्यात
17
महाविद्यालयात किती रिक्त जागा; आज कळणार , अकरावी प्रवेश प्रक्रियेचा पुढील टप्पा २१ मेपासून 
18
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण; याचिकेवर सुनावणीस सुप्रीम कोर्टाचा नकार
19
‘डीसीजीए’ विमान इंधन स्वीचची  ‘बोईंग’मध्ये करणार चौकशी; पथक लवकरच अमेरिकेत जाऊन तपास करणार
20
भटके कुत्रे : सुप्रीम कोर्टाने आपली जबाबदारी झटकली; मनेका गांधींचा आरोप, पूर्वीचे आदेशच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

मीरा भाईंदर महापालिका स्थायी समिती सभापती पदासाठी ४ मार्चला होणार निवडणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2026 20:35 IST

महापालिकेत ९५ पैकी ७८ भाजपाचे नगरसेवक आहेत

लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड: मीरा भाईंदर महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या समजली जाणारी स्थायी समिती ही पूर्णपणे भाजपाच्या ताब्यात आहे. आता स्थायी समिती सभापती पदासाठी भाजपात चुरस असून येणाऱ्या ४ मार्च रोजी सभापती पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, हे आमदार नरेंद्र मेहतांवर अवलंबून असणार आहे.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

महापालिकेत ९५ पैकी ७८ नगरसेवक भाजपाचे निवडून आल्याने १६ सदस्यांच्या स्थायी समिती मध्ये देखील भाजपाचे पूर्ण वर्चस्व असून १३ सदस्य समितीमध्ये आहेत. भाजपाचे गटनेते हसमुख गेहलोत सह पंकज पांडेय, दीपक सावंत, विशाल पाटील, संजय थेराडे, हेतल परमार, गणेश शेट्टी, नवीन सिंह, वंदना भावसार, आनंद मांजरेकर, अनिल विराणी, श्रीप्रकाश उर्फ मुन्ना सिंह व मनोज दुबे हे नगरसेवक सदस्य आहेत. मीरा भाईंदर विकास आघाडीच्या वतीने काँग्रेसचे गटनेते जय ठाकूर, अनिल सावंत तर शिंदेसेनेच्या शर्मिला बगाजी आहेत.

आ. मेहतांचे मर्जीतले मानले जाणारे हसमुख गेहलोत यांना गटनेते पाठोपाठ स्थायी समिती मध्ये पण सदस्य केल्याने सभापती पदाची माळ आ. मेहता हे त्यांच्याच गळ्यात टाकण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजपाचे जवळपास सर्वच सदस्य हे आ. मेहतांचे समर्थक मानले जातात. महापालिकेत पदे देण्याच्या निर्णयात आ. मेहतांचा शब्द मोलाचा असून महापौर पदी त्यांनी त्यांच्या भावाची पत्नी डिंपल यांना पुन्हा संधी दिली. या शिवाय अन्य पदे देखील मर्जीतल्याना दिली आहेत. 

साहजिकच पालिका तिजोरीच्या चाव्या असलेले स्थायी समिती सभापती पद देखील आ. मेहता हे त्यांच्याच मर्जीतल्या नगरसेवकास देणार असे मानले जाते. स्थायी समिती सभापती पदासाठी महापालिका आयुक्तांच्या पत्रा नंतर कोकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी मंगळवारी दि. २४ फेब्रुवारी रोजी पत्र काढून पीठासीन अधिकारी म्हणून मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांची नियुक्ती केली आहे. ४ मार्च रोजी महापालिका मुख्यालयात हि निवडणूक होणार आहे. 

महिला बालकल्याण समिती सभापती व उपसभापती पदाचीही निवडणूक

९ नागरसेविकांच्या महिला आणि बाल कल्याण समिती सभापती पदासाठी देखील ४ मार्च रोजीच निवडणूक होणार आहे. समिती मध्ये भाजपाच्या ७ तर काँग्रेसच्या २ नगरसेविका आहेत. भाजपाच्या अनिता पाटील, सुरेखा सोनार, जया दत्ता, स्नेहा पांडे, हेमा बेलानी, रुपाली मोदी व दीप्ती भट तर काँग्रेसच्या रुबिना शेख, रिझवाना खान ह्या नगरसेविकांचा समिती मध्ये समावेश आहे. महापौर पदासाठी चर्चेत राहिलेल्या ज्येष्ठ नगरसेविका अनिता पाटील यांना निदान ह्या समितीचे सभापती पद मिळणार का? अशी चर्चा आहे. या शिवाय स्नेहा पांडे, दीप्ती भट सह सुरेखा सोनार, हेमा बेलानी, रुपाली मोदी यांची नावे देखील सभापती आणि उपसभापती पदासाठी चर्चेत आहेत.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Mira Bhayandar Municipal Corporation Standing Committee Chairperson Election on March 4

Web Summary : Mira Bhayandar Municipal Corporation's Standing Committee chairperson election is scheduled for March 4. The key position, currently BJP-dominated, sees internal competition. The decision rests on MLA Narendra Mehta's influence. Women and Child Welfare Committee elections also occur on the same day.
टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुकMira Bhayander Municipal Corporation Electionमीरा-भाईंदर महानगरपालिका निवडणूक २०२६BJPभाजपा