शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
4
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
5
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
6
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
7
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
8
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
9
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
10
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
11
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
12
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
13
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
14
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
15
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
16
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
17
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
18
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
19
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
20
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत

वाढदिवस साजरा करून परतताना तरुणाचा मृत्यू; खड्ड्यामुळे दुर्घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2019 12:25 AM

मित्रांसोबत वाढदिवस साजरा करून दुचाकीने घरी परतताना खड्ड्यामुळे झालेल्या अपघातात २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना काल्हेर येथील राजलक्ष्मी कॉम्प्लेक्ससमोर घडली.

भिवंडी : मित्रांसोबत वाढदिवस साजरा करून दुचाकीने घरी परतताना खड्ड्यामुळे झालेल्या अपघातात २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना काल्हेर येथील राजलक्ष्मी कॉम्प्लेक्ससमोर घडली. पीयूष विजय मिश्रा (रा. मानव कॉम्प्लेक्स, काल्हेर) हे मृताचे नाव आहे.पीयूष वाढदिवसासाठी मित्रांसोबत ठाण्यातील एका कॅफेमध्ये गेला होता. रात्री उशिरा वाढदिवसाची पार्टी उरकल्यानंतर मित्राचीच दुचाकी घेऊन तो घराकडे निघाला होता. पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास तो काल्हेर येथील राजलक्ष्मी कॉम्प्लेक्ससमोर आला असता, त्याची दुचाकी खड्ड्यात आदळून खाली पडली.या अपघातात त्याला जबर मार लागल्याने त्याची शुद्ध हरवली. आजूबाजूच्या नागरिकांना अपघाताची माहिती होताच, त्यांनी त्याला बेशुद्धावस्थेत रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, गंभीर मार लागल्याने त्याला मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. त्यामुळे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.या अपघातप्रकरणी शनिवारी नारपोली पोलीस ठाण्यात मृत पीयूष याच्याविरोधात हयगयीने दुचाकी चालवल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पराग भाट करीत आहेत.

टॅग्स :AccidentअपघातPotholeखड्डे