शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
6
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
7
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
8
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
9
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
10
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
11
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
12
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
13
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
14
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
15
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
16
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
17
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
18
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
19
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
20
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव

CoronaVirus Lockdown News: ...तर बदलापुरातील दुकाने सोमवारपासून होणार सुरू; व्यापाऱ्यांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2021 11:57 PM

: नुकसानभरपाई द्या, मग टाळेबंदी करा

बदलापूरः राज्य शासनाने लागू केलेली टाळेबंदी अन्यायकारक असून आम्हाला दुकाने सुरू करण्याची परवानगी द्या. अन्यथा आम्हाला नुकसानभरपाई द्यावी, त्यानंतर हवे तितके दिवस टाळेबंदी करावी, अशी मागणी करून गुरुवारी बदलापूर आणि अंबरनाथमधील व्यापाऱ्यांनी सोमवारपासून दुकान सुरू आंदोलन करण्याचा इशारा गुरुवारी दिला. या मागण्या मान्य न झाल्यास सोमवारपासून दुकाने उघडली जातील. त्यानंतर कोणताही गुन्हे दाखल केले तरी आम्हाला फरक पडणार नाही, असेही व्यापारी संघटनांनी जाहीर केले आहे.गेल्या दोन दिवसांपासून राज्य शासनाने लागू केलेली अंशतः टाळेबंदीवरून व्यापारीवर्गात असंतोष पसरला आहे. त्याचा फटका व्यापारीवर्गाला बसत असून त्याविरुद्ध पहिल्या दिवसापासूनच व्यापारी संघटना, दुकानदार संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. गेल्या आठवड्यात लागू केलेल्या संचारबंदीच्या नियमात पोलिसांच्या आवाहनावरून व्यापाऱ्यांनी रात्री आठनंतर कोणतीही सूचना नसताना दुकाने बंद करून सहकार्य केले. मात्र, व्यापाऱ्यांना गृहीत धरून राज्य शासनाने पुन्हा अंशतःच्या नावाखाली पूर्णतः टाळेबंदी केल्याचा निषेध म्हणून गुरुवारी बदलापुरातील बाजारपेठ व्यापारी जनसेवक मित्र मंडळाने शांततापूर्ण मार्गाने आंदोलन केले. सकाळी अकरा वाजल्यापासून सर्व दुकानदार राज्य शासनाच्या निषेधाचे फलक घेऊन आपल्या बंद दुकानाबाहेर उभे होते. यावेळी कोणतीही घोषणाबाजी न करता टाळेबंदीला विरोध केला. शासनाने टाळेबंदीतील आमच्या नुकसानीचा पंचनामा करून आम्हाला मदत जाहीर करावी, यापुढे प्रतिमाह ५० हजार रुपयांची नुकसानभरपाई देऊन हवे तेवढे दिवस टाळेबंदी करावी, अशी आमची मागणी असल्याचे बाजारपेठ व्यापारी जनसेवक मित्र मंडळाचे सचिव श्रीराम चुंबळे यांनी सांगितले.राज्य शासनाने दुकानांबाबत सकारात्मक निर्णय न घेतल्यास आम्ही सोमवारपासून आमची दुकाने  सुरू करणार आहोत. दुकान बंद असल्याने असेही आमचे नुकसान होत असून गुन्हे दाखल केल्यानंतर आणखी किती नुकसान होईल, अशीही भूमिका व्यापाऱ्यांनी जाहीर केली आहे.अंबरनाथमध्ये व्यापाऱ्यांचे आंदोलन, ‘लॉकडाऊन हटाव, व्यापार बचाव’चे झळकवले फलकअंबरनाथ : सोमवारपासून राज्यासह अंबरनाथमध्ये मिनी लॉकडाऊन लागू झाल्यामुळे व्यापारी बांधवांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. व्यापारीवर्गावर लावलेले निर्बंध वेळीच हटवले नाहीत तर नाईलाजाने दुकाने उघडण्याचा इशारा अंबरनाथ शहर व्यापारी संघटनेने शासनाला दिला आहे.मिनी लॉकडाऊनमुळे लावलेल्या निर्बंधांच्या निषेधार्थ गुरुवारी अंबरनाथ व्यापारी महासंघातर्फे संघटनेचे अध्यक्ष खानजी धल यांच्या नेतृत्वाखाली रेल्वेस्थानक परिसरात पूर्व आणि पश्चिम भागात व्यापारी बांधवांनी मानवी साखळी करून शासनाच्या निर्णयाचा निषेध नोंदविला.मिनी लॉकडाऊनमध्ये शनिवारी आणि रविवारी दुकाने बंद राहतील, असे सांगण्यात आले होते. मात्र, नव्या निर्बंधांमुळे व्यापारी वर्गात संभ्रमावस्था निर्माण केली गेली. यावेळी लॉकडाऊन हटाव, व्यापार बचाव, व्यापाऱ्यांना लॉकडाऊन मंजूर नाही अशा घोषणा देणारे फलक हातात घेतले होते. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या