शहरं
Join us  
Trending Stories
1
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
2
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
3
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
4
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
5
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
7
लग्नाच्या जल्लोषात रक्तरंजित वळण; नाचण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाचा खून, चौघांविरोधात गुन्हा दाखल
8
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
9
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
10
"छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द खपवून घेणार नाही...", रितेश देशमुखने धीरेंद्र शास्त्रींना स्पष्ट शब्दांत सुनावलं
11
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
12
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
13
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
14
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
15
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
16
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
17
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
18
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
19
लहान वयात मोठी व्याधी! ४ ते ८ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये वाढतोय आता ‘किडनी स्टोन’चा धोका 
20
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे महापालिकेच्या निष्काळजीपणामुळेच कोरोनाग्रस्ताला गमवावा लागला जीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2020 00:17 IST

मनसेने केला आरोप : संबंधितांच्या चौकशीची केली मागणी, आयुक्तांना दिले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ठाणे महापालिकेच्या संबंधित यंत्रणेच्या निष्काळजीपणामुळे भिवंडी येथे राहणाऱ्या वासुदेव पाल यांना जीव गमवावा लागला असल्याचा आरोप करून त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या संबंधितांची चौकशी होऊन तत्काळ कारवाई करण्याची मागणी मनविसेचे जिल्हाध्यक्ष संदीप पाचंगे यांनी महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

पाल यांना कळवा येथील छत्रपती शिवाजी रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल २४ तासांत येणे अपेक्षित असताना तब्बल तीन दिवसांनी म्हणजेच ९ सप्टेंबरला त्यांच्या नातेवाइकांना देण्यात आला. या रुग्णाला बाकीचेदेखील आजार होते. त्यांच्या नातेवाइकांनी महापालिका अधिकाऱ्यांना वारंवार विनंती करूनही बाळकुम येथील कोविड हॉस्पिटलमध्ये रुग्णालयात दाखल केले जात नव्हते. अखेर, १३ सप्टेंबरला ग्लोबल हॉस्पिटलमध्ये आणले आणि १२ तासांत हा रुग्ण दगावला, असे मनसेने या निवेदनात म्हटलेआहे. महापालिकेच्या निष्काळजीपणामुळे माझ्या सासºयाचा मृत्यू झाला, अशी तक्रार त्यांचे जावई अखिलेश पाल पाचंगे यांच्याकडे केली होती. त्यानंतर त्यांनी संबंधितांवर कारवाईची मागणी पालिका आयुक्तांकडे केली आहे.मृत व्यक्तीस वेळीच उपचार मिळाले असते, तर कदाचित त्यांचे प्राण वाचू शकले असते. यासंदर्भात संबंधितांवर कारवाईची मागणी केली आहे आणि मनसे या प्रकरणाचा पाठपुरावा करत राहणार आहे.

- संदीप पाचंगे,ठाणे जिल्हाध्यक्ष मनविसे

सासºयांना कोविड हॉस्पिटलमध्ये आयसीयू बेड मिळावा, यासाठी संबंधित अधिकाºयांना विनवण्या करीत होतो. कळवा हॉस्पिटल हे कोविड हॉस्पिटलमध्ये नसतानाही त्यांना पाच दिवस तेथे दाखल केले होते आणि सहाव्या दिवशी ग्लोबल हॉस्पिटलमध्ये नेले. हे वेळीच झाले असते तर आमच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला नसता.- अखिलेश पाल, मृताचे नातेवाईकया प्रकरणाची चौकशी करून निर्णय घेतला जाईल.- संदीप माळवी, उपायुक्त, ठाणे मनपा

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिका