शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
4
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
5
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
6
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
7
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
8
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
9
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
10
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
11
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
12
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
13
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
14
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
15
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
16
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
17
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
18
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
19
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
20
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप

Corona Vaccination: पालघरमधील लसीकरण मोहीम ऑक्सिजनवर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2021 12:18 AM

जिल्ह्याच्या भांडारातील लससाठा संपला; आरोग्य विभागाने ८५ हजार नवीन लसींच्या साठ्याची केली मागणी

- हितेन नाईकपालघर : पालघर जिल्ह्यातील लसीकरण मोहीम ऑक्सिजनवर असून डहाणू तालुक्यातील कासा आणि वसई तालुक्यातील निर्मळ येथील लसीकरण केंद्रे लसीचा साठा नसल्याने बंद पडली आहेत. ग्रामीण भागातील केंद्रात ९ हजार २४० तर शहरी भागात ३ हजार १७० इतक्या शेवटच्या लसीचा साठ्यांचे वितरण करण्यात आले असून पालघर पूर्व मधील लसीकरण भांडारातील लस साठा संपला आहे. आरोग्य विभागाने ८५ हजार नवीन लसीच्या साठ्यांची मागणी पुण्याच्या आरोग्य संचालकांकडे केली असली तरी राज्य शासनाकडे लसीचा साठा शिल्लक नसल्याने जिल्ह्यातील लसीकरण मोहीम ठप्प पडण्याची स्थिती निर्माण झाली आहे.कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत महाराष्ट्रात कोरोना संसर्गाचा स्फोट झाला असून राज्यात तीन दिवस पुरेल इतकाच साठा शिल्लक असल्याचे खुद्द आरोग्य मंत्र्यांनी मान्य केल्याने पालघर जिल्ह्यातून आरोग्य संचालनालय, पुणे येथे ८५ हजार लसीची करण्यात आलेली मागणी पूर्ण होण्याची शक्यता कमीच आहे. पालघर जिल्ह्याला कोव्हिशिल्ड लसीचा १ लाख ३४ हजार ७३० चा साठा उपलब्ध झाला असून कोवॅक्सिनचा १० हजार २४० चा साठा प्राप्त झाला होता. जिल्ह्यात शासकीय ५२ तर खाजगी १७ अशा एकूण ६९ केंद्रातून लसीकरण मोहीम सुरू आहे.पालघर पूर्व वेवूर येथील आरोग्य विभागाच्या लस भांडार केंद्रातील ९ हजार २४० लसी जिल्ह्यातील ग्रामीण भागात, तर ३ हजार १७० लसी शहरी भागातील केंद्रांत वितरित करण्यात आल्या आहेत.राज्यात चार दिवस पुरेल इतकाच लसीचा साठा असल्याचे खुद्द आरोग्य मंत्र्यांनी जाहीर केल्याने गुरुवारी पालघर ग्रामीण रुग्णालयाच्या लसीकरण केंद्रावर सकाळपासूनच नागरिकांनी गर्दी केली होती. यावेळी काही नागरिकांमध्ये बाचाबाचीही झाल्याने शेवटी पोलिसांना पाचारण करण्यात आले.कालच्या व्हीसीमध्ये उपलब्ध साठा संपवा. रिपोर्टिंगमध्ये झिरो आकडा आला की केंद्राकडून साठा उपलब्ध होणार असल्याने ८५ हजार लसीची मागणी केली आहे.- डॉ. दयानंद सूर्यवंशी, जिल्हा आरोग्य अधिकारी, पालघरलसीकरण केंद्रावर खूप गर्दी असल्याने संख्या कमी होण्याची वाट पाहत असताना आता लसीचा साठा नसल्याने केंद्राने तात्काळ लसीचा साठा उपलब्ध करून द्यावा.    - संतोष चुरी, पालघरआम्ही लसीकरणाला जाण्याची तयारी करत असताना लसीचा साठा संपला आहे. त्यामुळे केंद्राने तात्काळ राज्याकडून करण्यात आलेली लसीची मागणी पूर्ण करावी.    - आशिष पाटील, विकासक, पालघर

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस