शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश
2
माढा, सोलापूरात महाविकास आघाडीला धक्का; देवेंद्र फडणवीसांच्या खेळीनं भाजपाला फायदा
3
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर
4
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
5
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
6
अखिलेश यादव यांचा समाजवाद की परिवारवाद? कुटुंबातील एवढे सदस्य लोकसभेच्या रिंगणात 
7
Fact Check : "मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल"; 'ती' क्लिप खोट्या दाव्यासह व्हायरल, जाणून घ्या 'सत्य'
8
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
9
विराट-अनुष्काचा मुलगा 'अकाय' कसा दिसतो? टीव्ही अभिनेता आमिर अली म्हणाला...
10
टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत
11
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
12
बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्या शिक्षकाचं हादरवणारं कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
13
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
14
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
15
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
16
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
17
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
18
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
19
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
20
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात

कोरोनाचा वृद्धांपेक्षा तरुणांनाच धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2020 12:07 AM

पुरुषांच्या तुलनेत महिला रुग्ण ५० टक्के । ६० वर्षांवरील वयोगटात ८२८ रुग्ण

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांमध्ये महिला रुग्णांचे प्रमाण हे पुरुष रुग्णांच्या तुलनेत ५० टक्के इतके आहे. तसेच एकूण रुग्णांमध्ये २६ ते ४० या वयोगटांतील तरुणांचे प्रमाण अधिक आहे. या वयोगटांतील रुग्णांच्या तुलनेत ६० वर्षांवरील रुग्णांचे प्रमाण हे ५० टक्के इतके आहे. त्यामुळे कोरोना हा वृद्धांपेक्षा तरुणांकरिता घातक ठरला आहे. स्त्रियांच्या तुलनेत पुरुषांमध्ये तंबाखू सेवन, धूम्रपान, मद्यपानाचे प्रमाण अधिक असल्याने पुरुष रुग्णांची संख्या जास्त आहे.वय वर्षे १ ते २५ आणि ४१ ते ५० या वयोगटांतील रुग्णसंख्येत अवघा १०० रुग्णांचा फरक आहे. ठाणे जिल्ह्यात २९ मे पर्यंत सात हजार ३८७ रुग्ण आढळले. त्यापैकी तीन हजार ५०५ रुग्ण बरे होऊन घरी परतले. तीन हजार ६५५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत २२३ जणांचा मृत्यू झाला आहे.जिल्ह्यात नोंद झालेल्या सात हजार ४५ रुग्णांमध्ये चार हजार ६५९ पुरुष रुग्ण आहेत, तर दोन हजार ३८६ स्त्री रुग्ण आहेत. या रुग्णांचे पाच वयोगटांत वर्गीकरण केले आहे. त्यामध्ये १ ते २५ या वयोगटांत एक हजार ५७१ रुग्ण आहेत तर, २६ ते ४० या वयोगटांत सर्वाधिक एक हजार ७८६ रुग्ण आहेत. ४१ ते ५० या वयोगटांमध्ये एक हजार ४९७ रुग्ण आहेत तर, ५१ ते ६० या वयोगटांमध्ये एक हजार ३६३ रुग्ण आढळून आले आहेत. ६० च्या पुढील वयोगटांत ८२८ रुग्णांची नोंद आहे.पाचही वयोगटांतील रुग्णांमध्ये ठाणे महापालिका कार्यक्षेत्रातील रुग्णांची संख्या अधिक आहे. २६-४० या वयोगटांत ठामपा क्षेत्रात ७४६ रुग्ण आहेत. त्या खालोखाल १ ते २५ या वयोगटांत ६३० रुग्ण असून ६० वर्षांवरील गटात सर्वात कमी २१२ रुग्ण असल्याचे शासकीय आकडेवारीवरून दिसत आहे.६० वर्षांवरील वयोगटांतील रुग्णसंख्येत नवी मुंबई महापालिका ठामपापेक्षा एक रुग्णाने मागे आहे. नवी मुंबईत २११ रुग्ण आढळून आले आहेत. ६० वर्षांवरील सर्वात कमी १२ रुग्ण हे अंबरनाथ येथे आढळले आहेत.भिवंडीत १४ रुग्णभिवंडी : शहरात शनिवारी सात रुग्ण आढळले असून एकाचा मृत्यू झाला. ग्रामीण भागातही सात नवे रुग्ण आढळले आहेत. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २०९ वर पोहोचली आहे. ग्रामीण भागातील एकूण आकडा ९० वर पोहोचला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या