शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
3
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
4
Top Marathi News LIVE Updates:खरातच्या अकाउंटला बोगस खात्यांतून कोट्यवधी रुपये ट्रान्सफर
5
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
6
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
7
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
8
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
9
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
10
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
11
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
12
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
13
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
14
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
15
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
16
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
18
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
19
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
20
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
Daily Top 2Weekly Top 5

...अन्यथा जनता आपल्याला जोडे मारेल; उद्धव ठाकरे यांच्या कानपिचक्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2020 06:19 IST

भाजपवर केली टीका, विविध विकास प्रकल्पांचे लोकार्पण

ठाणे : क्लस्टरच्या मागणीकरिता यापूर्वी आम्ही आंदोलने केली, बंद केले. आता सत्ता मिळाल्याने जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करा. अन्यथा, जनता आपल्याला जोड्याने मारेल, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी शिवसेनेसह महाविकास आघाडीतील पक्षांना कानपिचक्या दिल्या.

क्लस्टरसाठी आणि एसआरएसाठी स्वतंत्र प्राधिकरणे स्थापन केली जातील. तसेच मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (एसआरए) संपूर्ण क्षेत्रात क्लस्टर योजना राबविण्याचा विचार सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मुंबईच्या धर्तीवर ठाण्यात एसआरए योजनेचा विकास करताना एमएमआर रिजनमध्येही क्लस्टरची योजना राबविली जाणार आहे. शिवाय, एमएमआर क्षेत्राचे वेगळे प्राधिकरण केले जाणार आहे. त्यामुळे या भागाचा विकास त्याच ठिकाणी होण्यास मदत होणार असल्याची माहिती नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना पूर्वी आम्ही कधीतरी लपूनछपून भेटत होतो. मात्र, आता महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्याने उघडपणे भेटत आहोत. परंतु, पूर्वी जे उघडपणे भेटत होते, ते आता गायब झाले आहेत, अशी टीकाही ठाकरे यांनी भाजपचा थेट उल्लेख न करता केली. गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या व नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अगोदर छुप्या व आता उघड असलेल्या मैत्रीचा हवाला देत भाजपवर शरसंधान केले होते. तोच धागा पकडून ठाकरे यांनीही भाजपला लक्ष्य केले.

ठाणे शहरातील किसननगर भागातील क्लस्टरचे भूमिपूजन, बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे लोकार्पण केल्यानंतर डॉ. काशिनाथ घाणेकर येथे ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाचे भूमिपूजन, डेब्रिज प्रकल्पाचे लोकार्पण, प्रकल्पबाधितांना बीएसयूपीअंतर्गत घरांचे चावीवाटप, दिव्यांगांना सदनिका आणि स्टॉलचे वाटप, आपला दवाखाना योजनेचे लोकार्पण, शहरातील सात ठिकाणच्या खाडीकिनाऱ्यांचा वॉटरफ्रंट डेव्हलपमेंट, अर्बन जंगल आणि सायन्स पार्कचे भूमिपूजन, अनाथ-निराधार लाभार्थ्यांना अनुदानाचे वाटप, लाडकी लेक दत्तक योजनेंतर्गत अनुदानाचे वाटप, कमांड अ‍ॅण्ड कंट्रोल सेंटर, ठाणे ग्लोबल इम्पॅक्ट हबचे लोकार्पण आणि संकेतस्थळाचे अनावरण अशा नानाविध योजनांचे ई-लोकार्पण आणि भूमिपूजन केल्यानंतर ठाकरे बोलत होते.

ठाणे आणि शिवसेनेचे मागील २५ वर्षांपासूनचे अतूट नाते आहे, त्यामुळेच या ठाणेकर जनतेने टाकलेला विश्वास आम्ही सार्थकी ठरवत आहोत. ठाण्याचे रूप बदलले आहे. परंतु, ठाणेकर हे अजून साधेच आहेत. ठाणेकर एकदा प्रेम दिले की, भरभरून देतात. आज बाळासाहेब व आनंद दिघे यांची आठवण आल्याशिवाय राहत नसल्याचेही त्यांनी सांगितले.ठाणे महापालिका आयुक्तांचे कौतुक करताना मुंबई शहर मोठे असतानाही त्याचा विकास अद्यापही हवा तसा झालेला नाही. त्यामुळे मुंबईच्या आयुक्तांना मी ठाण्यात येऊन येथील प्रकल्पांची पाहणी करावी, अशा सूचना केल्याचेही ठाकरे म्हणाले.

ठाण्याचा विकास बघितल्यावर पोटात नाही दुखत, उलट छाती अभिमानाने भरून येते, त्यामुळे ठाणेकरांनी फक्त काय पाहिजे, ते सांगावे. ते देण्याची आमची तयारी असल्याचे आश्वासन त्यांनी दिले. ठाण्यात किसननगर भागात किंवा दिव्यात एकमेकींना चिकटून इमारती उभ्या आहेत. त्यावर क्लस्टर हा चांगला उपाय आहे, असे ते म्हणाले.ठाण्याचा झपाट्याने विकास करण्याकरिता महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी खूप कामे केली आहेत. त्यामुळे निवृत्तीपर्यंत त्यांना येथेच आयुक्तपदी ठेवा किंवा अन्य कोणते पद देऊन त्यांना ठाण्यात ठेवा, अशी मागणी गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली.

यावेळी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, खा. राजन विचारे, श्रीकांत शिंदे, आ. प्रताप सरनाईक, रवींद्र फाटक, महापौर नरेश म्हस्के, उपमहापौर पल्लवी कदम, माजी महापौर संजय मोरे, मीनाक्षी शिंदे, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल, पोलीस आयुक्त विवेक फणसळकर आदी मान्यवर उपस्थित होते.शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या लोकार्पणप्रसंगी नगरसेवक विकास रेपाळे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, खा. राजन विचारे, उपमहापौर पल्लवी कदम, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल, पालकमंत्री तथा नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, महापौर नरेश म्हस्के, आमदार रवींद्र फाटक, अनंत तरे व स्थायी समिती सभापती राम रेपाळे आदी मान्यवर.

पोलीस, चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांसाठी घरे राखीव

शासनाच्या गृहसंकुलांच्या प्रत्येक योजनेत पोलीस आणि चतुर्थश्रेणीच्या कर्मचाºयांना प्रत्येकी १० टक्के घरे राखीव ठेवली जातील, असे आश्वासनही ठाकरे यांनी दिले.मोठे उद्योगधंदे उभे राहण्यात अडचणी येत असल्या, तरी स्टार्टअपच्या माध्यमातून छोटेमोठे उद्योगधंदे उभे करून रोजगारनिर्मिती केली जात असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेmaharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारthaneठाणेMumbaiमुंबईMaharashtraमहाराष्ट्रJitendra Awhadजितेंद्र आव्हाडEknath Shindeएकनाथ शिंदे