शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
3
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
4
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
6
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
7
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
8
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
9
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
10
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
11
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
12
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
13
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
14
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
15
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
16
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
17
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
18
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
19
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
20
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मीरा रोडमध्ये यात्रेतून स्वच्छतेचा संदेश

By admin | Updated: March 29, 2017 05:20 IST

काँग्रेसचे माजी आमदार मुझफ्फर हुसेन यांच्यावतीने काढलेल्या स्वागतयात्रेला सिल्वर पार्क येथील साईबाबा

भार्इंदर/मीरा रोड : काँग्रेसचे माजी आमदार मुझफ्फर हुसेन यांच्यावतीने काढलेल्या स्वागतयात्रेला सिल्वर पार्क येथील साईबाबा मंदिराजवळ गुढी उभारून सुरुवात झाली. सिल्वर पार्क व रामनगर येथून निघालेल्या यात्रा शांतीपार्क, जांगिड सर्कल, शांतीगार्डन, सृष्टी, पूनमसागर, शांतीविहार, शांतीनगर सेक्टर ३ मधील जैनमंदिर ते मीरा रोड रेल्वेस्थानक दरम्यान यात्रेत ठिकठिकाणी गुढी उभारण्यात आल्या. तसेच रांगोळ्या काढण्यात आल्या. शांतीनगर परिसरात मुस्लिमांनी यात्रेचे स्वागत केले. मीरा रोड रेल्वे स्थानक परिसरात सांगता झालेल्या यात्रेच्या ठिकाणी मुख्य रांगोळी स्पर्धा झाली. त्यात महिलांचे एकूण १२ गट सहभागी झाले होते. त्यातील तीन महिलांना हुसेन यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यात्रेत वारकरी दिंडी, ध्वजपथक, ढोलपथक, लेझीम पथक, चित्ररथ, दानपट्टा, मर्दानी खेळाचा समावेश करण्यात आला होता. रेल्वे स्थानक परिसरात यात्रेची सांगता झाल्यानंतर तेथे मराठी संगीताचा कार्यक्रम झाला. यात्रेत मुझफ्फर हुसेन, माजी उपमहापौर नूरजहाँ हुसेन यांच्यासह प्रदेश महासचिव राजेश शर्मा, सचिव मेहुल व्होरा, जिल्हाध्यक्ष अनिल सावंत, नगरसेवक जुबेर इनामदार, प्रमोद सामंत, अश्रफ शेख, नगरसेविका कांचना पुजारा, मर्लिनन डिसा सहभागी झाले होते.मीरा रोडमध्ये नववर्ष स्वागतयात्रा समितीच्या वतीने काढलेल्या यात्रेत स्वच्छतेचा संदेश देण्यात आला. यात्रेला शाश्वत गृहसंकुल येथून सुरूवात झाली. सिल्वर पार्क येथील साईबाबा मंदिराजवळ सांगता झाली. यात २५ सामाजिक संस्था सहभागी झाल्या होत्या. संत गाडगेबाबा महराज, भारतमाता रथ विशेष आकर्षण ठरले. आमदार नरेंद्र मेहता, महापौर गीता जैन, समितीचे गजानन नागे, अजित साळुंखे, मिलिंद देव, संजय पवार, मयूर जाधव सहभागी झाले होते. दरम्यान, काशिमीरामधील पांडुरंगवाडी आणि घोडबंदर गावातही पालखी व शोभायात्रा काढण्यात आली. पारंपारिक वेशभूषेत महिला सहभागी झाल्या होत्या. (प्रतिनिधी)