‘Allah knew Corona would come in 2020’; Video of ncp leader Jitendra Awhad's statement goes viral | ‘अल्लाह को पता था २०२० में कोरोना आयेगा’; आव्हाड यांच्या वक्तव्याचा व्हिडीओ व्हायरल

‘अल्लाह को पता था २०२० में कोरोना आयेगा’; आव्हाड यांच्या वक्तव्याचा व्हिडीओ व्हायरल

मुंब्रा : ‘अल्लाह को पता था २०२० में कोरोना (कोविड) आयेगा, उससे पहले मुंब्रा में नया कब्रस्तान बनना चाहिये. इसलिए २०११ में मुंब्रा में नया कब्रस्तान बनाने को मंजुरी मिली और २०१९ में यहाँ (मुंब्र्यात) कब्रस्तान शुरू हुआ’, असे विधान करणारा गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ते शुक्रवारी रात्री कौसा भागातील एका नगरसेविकेच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्‌घाटनप्रंसगी उपस्थितांशी संवाद साधत होते. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले. 

‘आप बोलते हो सब कुछ अल्लाह करता है. तो यह कब्रस्तान भी उनकी (अल्लाह) ही बनाई हुई चिज है,’ असेही ते व्हिडिओमध्ये बोलताना दिसत आहेत. दरम्यान, आव्हाड यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे येथील तीन एकर भूखंडावर अस्तित्वात असलेल्या कब्रस्तानमधील काही भाग कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांना दफन करण्यासाठी राखीव ठेवण्यात आला आहे.

जर हे कब्रस्तान सुरू झाले नसते, तर कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचे मृतदेह दफन करण्यासाठी समस्या निर्माण झाली असती, अशी माहिती स्थानिक कार्यकर्त्यांनी ‘लोकमत’ला दिली. आव्हाड यांच्याशी याबाबत संपर्क साधला असता, ते म्हणाले की, सर्वशक्तिमान ईश्वर, अल्लाहला भविष्यातील सर्व संकटं आणि सर्वकाही ज्ञात असतं, एवढंच हे बाेलण्यामागील माझा उद्देश होता.

Web Title: ‘Allah knew Corona would come in 2020’; Video of ncp leader Jitendra Awhad's statement goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.