शहरं
Join us  
Trending Stories
1
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
2
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
3
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
4
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
5
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
6
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
7
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
8
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
9
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
10
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
11
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
12
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
13
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
14
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
15
पंत, संजू सॅमसन बाहेर; नवख्या प्रिन्स यादव, गुरनूर ब्रारला संधी! BCCIचे ५ आश्चर्यकारक निर्णय
16
DCM एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना; राजकीय घडामोडींना वेग, चर्चेला उधाण, नेमके घडतेय तरी काय?
17
भेदक गोलंदाजी, खालच्या फळीत जलद धावा करण्याची क्षमता; ६.५ फूट उंचीचा ऑलराउंडर टीम इंडियात!
18
"इंधन दर १७ रुपयांनी वाढले तरच...!", ब्रोकरेज फर्मनं मांडलं थक्क करणारं गणित; पेट्रोल-डिझेल आणखी भडकणार?
19
"रेवंत रेड्डी बनणार तेलंगणाचे 'शुभेंदु अधिकारी'!" भाजप खासदाराची भविष्यवाणी, केला मोठा दावा; काँग्रेसचं टेन्शन वाढणार 
20
मोहम्मद शमीचं आंतरराष्ट्रीय करिअर संपलं? "आम्ही त्याचा विचारच केला नाही..." आगरकर नेमकं काय म्हणाले?
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडी महापालिकेत निवडणुकीला वेगळे वळण! भाजपाने महापौरपदाचा उमेदवार ऐनवेळी बदलला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2026 16:59 IST

भिवंडी महापालिका महापौर पदाची निवडणूक तोंडावर असतानाच भाजपाने उमेदवार बदलत सगळ्यांना धक्का दिला आहे. 

भिवंडी महापालिका महापौर पदाच्या निवडणुकीला वेगळेच वळण मिळाले आहे. महापौर पदाच्या निवडणुकीच्या तोंडावरच भाजपाने आपला उमेदवार बदलला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत. 

भाजपाने यापूर्वी नारायण चौधरी यांना पक्षाचे महापौर पदाचा अधिकृत उमेदवार घोषित केले होते. नारायण चौधरी यांनी भाजपाकडून महापौर पदासाठीचा आपला उमेदवारी अर्ज देखील दाखल केला आहे.

दरम्यान, महापौर पदाच्या निवडणुकीला बुधवारी वेगळेच वळण लागले. भाजपाचे भिवंडी शहर अध्यक्ष रविकांत सावंत यांनी महापौर पदाच्या उमेदवार म्हणून स्नेहा मेहुल पाटील यांच्या नावाची घोषणा केली आहे. त्यासंदर्भातील लेखी पत्र भाजपा शहराध्यक्षांनी भाजपाच्या सर्व नगरसेवकांना दिले आहे.

भाजपाने आता स्नेहा मेहुल पाटील यांची महापौर पदाची अधिकृत उमेदवार म्हणून जाहीर केले आहे, अशी माहिती भाजप शहराध्यक्ष रविकांत सावंत यांनी दिली आहे.

महापौर पदासाठी कोणा-कोणाचे अर्ज?

भिवंडी महापालिका महापौर पदाच्या निवडणुकीत कोणार्क विकास आघाडीचे विलास आर. पाटील यांचा मुलगा मयुरेश पाटील, पत्नी आणि माजी महापौर प्रतिभा पाटील, भिवंडी विकास आघाडीचे जावेद दळवी, काँग्रेसचे तारीक मोमीन, भाजपाकडून नारायण चौधरी, स्नेहा मेहुल पाटील, शिवसेनेकडून बाळाराम चौधरी, सुचिता म्हात्रे  यांनी उमेदवारीचा अर्ज भरलेला आहे. त्यात आता भाजपाने आपला उमेदवार बदलला आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Bhiwandi Mayor Election Takes Twist: BJP Changes Candidate Last Minute

Web Summary : Bhiwandi's mayoral race sees a sudden shift as BJP replaces Narayan Choudhary with Sneha Patil just before the election. The unexpected change has sparked political buzz. Multiple candidates from various parties are in the running.
टॅग्स :Municipal Electionमहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६Bhiwandi Nizampur Municipal Corporation Electionभिवंडी-निजामपूर महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६bhiwandiभिवंडीBJPभाजपाMayorमहापौर