शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

बनावट चेकद्वारे दोन बँकांना ५.७३ लाखांचा गंडा

By admin | Updated: December 26, 2016 07:17 IST

एका कंपनीच्या नावाने दोन बनावट चेक तयार करून त्यावर अधिकाऱ्यांच्या हुबेहूब सह्या करून त्या दोन चेकद्वारे

बदलापूर : एका कंपनीच्या नावाने दोन बनावट चेक तयार करून त्यावर अधिकाऱ्यांच्या हुबेहूब सह्या करून त्या दोन चेकद्वारे बदलापूर पूर्वेकडील भारतीय स्टेट बँक आणि आरबीएल बँक या दोन बँकांना ५ लाख ७३ हजारांचा गंडा घातल्याचा प्रकार घडला आहे.बदलापूर पश्चिमेकडे राहणारा हरीश पटेल याचे भारतीय स्टेट बँक औद्योगिक वसाहत येथे बचत खाते आहे. हरीश याने भारतीय स्टेट बँक, औद्योगिक वित्त, नागपूर शाखेचा मे. गंगा आर्यन अ‍ॅण्ड स्टील ट्रेडिंग कंपनी लिमिटेडच्या नावे असलेल्या खाते क्रमांकाचे २ बनावट चेक तयार केले. त्यावर, अधिकाऱ्यांच्या सहीप्रमाणे हुबेहूब सही करून त्यावर दिनांक आणि रक्कम लिहिली. ते दोन चेक बनावट असल्याची माहिती असूनही स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी भारतीय स्टेट बँकेची फसवणूक करण्याच्या उद्देशाने पे स्लीप भरून ३ लाख ८१ हजार ७२० रुपयांचा बनावट चेक बँकेत भरला. त्यापैकी २ लाख ८० हजारांची रोख रक्कम, एटीएम, पॉस मशीन व दुसऱ्या शाखेतील कॅश काउंटरवरून चेकद्वारे काढून फसवणूक केली. तसेच बदलापूर पूर्वेकडील आरबीएल बँक लिमिटेड येथेही पटेल याचे खाते असून त्या बँकेतसुद्धा त्याने १ लाख ९१ हजार ३३८ रुपयांचा बनावट चेक खात्यात जमा होताच त्यातून ५० हजारांची रक्कम काढून घेत त्या बँकेचीसुद्धा फसवणूक केली. हा प्रकार भारतीय स्टेट बँकेच्या लक्षात येताच त्यांनी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात हरीश पटेल याच्याविरुद्ध दोन बँकेच्या बनावट चेकद्वारे फसवणूक केल्याची तक्र ार दाखल केली आहे. (प्रतिनिधी)