शहरं
Join us  
Trending Stories
1
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
2
Election Results 2026 LIVE: मुंबईत भाजपाचा झालमुरी स्टॉल, पश्चिम बंगाल विजयाचं हटके सेलिब्रेशन
3
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
4
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
5
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
6
कैलास मानसरोवर यात्रेत नेपाळचा 'खो'! बालेन शाह सरकारने भारत अन् चीनला धाडलं पत्र; नेमकं प्रकरण काय?
7
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
8
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
9
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
10
थलपती विजयच्या ड्रायव्हरचा मुलगा झाला आमदार! तिकीट मिळालं तेव्हा स्टेजवर ढसाढसा रडला होता...
11
Kangana Ranaut : राहुल गांधींसोबतच्या लग्नाच्या अफवेवर कंगना राणौत संतापली; म्हणाली, "लाज वाटली पाहिजे"
12
जागतिक खळबळ: अमेरिकन युद्धनौकेवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला; दोन मिसाईल डागली, शस्त्रसंधी तुटली, युद्धाला पुन्हा तोंड फुटणार
13
दोन वर्षातच पश्चिम बंगालमध्ये असं काय बदललं की ममता बॅनर्जींना सत्तेवरून जावं लागलं?
14
भवानीपूर: ममता बॅनर्जी अन् सुवेंदू अधिकारी एकाचवेळी मतमोजणी केंद्रावर; मोठ्या प्रमाणावर पोलीस फोर्स तैनात
15
विजयचा झंझावात एवढा की...! मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन देखील आपली सीट वाचवू शकले नाहीत; TVK चे व्ही. एस. बाबू 'जायंट किलर'
16
IAS Aastha Singh : प्रेरणादायी यशोगाथा! आजोबांनी दाखवलं स्वप्न; अवघ्या २१ व्या वर्षी कोचिंगशिवाय आस्था बनली IAS
17
दिवसाला ८ तास कुलर चालवताय? मग महिन्याला किती वीज बिल येईल? वॉटनुसार जाणून घ्या खर्च!
18
IPL 2026 Points Table : प्लेऑफ्सच्या शर्यतीत कमालीचे ट्विस्ट! कोण टिकणार? कोणाचा प्रवास संपणार?
19
पश्चिम बंगाल, तामिळनाडूने बदललं देशाचे राजकारण; इंडिया आघाडीच्या भवितव्यावरही प्रश्न
20
NTR, MGR ते जयललिता..; 'या' सुपरस्टार्सनी मुख्यमंत्रिपदापर्यंत मारलेली मजल, पाहा यादी...
Daily Top 2Weekly Top 5

जोरदार वा-यासह झालेल्या पावसामुळे डोंबिवलीत पडली 25 झाडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 15:19 IST

वा-यासह जोरदार झालेल्या पावसामुळे डोंबिवली औद्योगिक परिसरात 25 झाडे कोसळून पडल्याची घटना घडली आहे.

डोंबिवली-गुरुवारी सायंकाळी झालेल्या वा-यासह जोरदार झालेल्या पावसामुळे डोंबिवली औद्योगिक परिसरात 25 झाडे कोसळून पडल्याची घटना घडली आहे. या घटनेत बंगले, इमारती आणि शाळेचे नुकसान झाले आहे. एक झाड रस्त्यावर पडल्याने तासभर वाहतूक कोंडी झाली होती. या वेळी बत्ती गुल झाल्याने अंधारात नेमके काय होत आहे, याची कल्पनाच नागरिकांना येत नव्हती.डोंबिवली परिसरात गुरुवारी सायंकाळी सहा वाजता जोरदार वा-यासह पावसाला सुरुवात झाली. हा पाऊस रात्री दहा वाजेपर्यंत सुरू होता. याच वेळी उस्मा पेट्रोल पंपाजवळ एक झाड रस्त्यातच कोसळले. त्यामुळे एक तास वाहतूक कोंडीचा सामना वाहन चालकांना करावा लागला. ग्रीन्स शाळा, सुदर्शननगर, सिस्टर निवेदिता शाळा, सेंट जोसेफ शाळा, बदाम गल्ली, पेंढरकर कॉलेज या परिसरात जवळपास 25 झाडे पाऊस वा-यामुळे पडली. हा प्रकार कळताच अग्निशमन दलाशी संपर्क केला गेला. अग्निशमन दलाचे अधिकारी दिलीप गुंड यांनी त्यांच्या ताफ्यासह घटनास्थळी धाव घेतली. तसेच महापालिकेच्या प्रभाग क्षेत्रतील सफाई कामगारांच्या मदतीने रस्त्यात पडलेली झाडे, त्याच्या फांद्या दूर हटविण्याचे काम सकाळपर्यंत सुरू होते. कृष्णाई बंगल्याच्या टेरेसवरील सिमेंटच्या पत्र्यावर झाड पडल्याने पत्रे फुटले आहेत. ग्रीन्स शाळेचे पत्र्यांचेही नुकसान झाले आहे. पडलेल्या झाडांमध्ये गुलमोहर, बदाम आदी झाडांचा समावेश आहे. गुलमोहरांची झाडे कमकुवत असल्याने जोरदार वा-यात ही झाडे प्रथम कोसळतात. मात्र बदामाचे झाड हे जाड बुंध्याचे असते. तसेच ते भक्कम असते. ते देखील कोसळले आहे. एका विशिष्ट परिसरात पावसाचा हा जोरदार परिमाण दिसून आला. त्याची झळ झाडांना जास्त बसली याविषयी नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे. एक झाड इतक्या जोरात कोसळले त्याठिकाणी असलेले नागरिक प्रदीप राजे यांच्या अंगावर कोसळणार होते. या घटनेतून राजे बचावले आहे. अन्यथा ते जखमी झाले असते.